प्रातिनिधिक छायाचित्र. File photo
ज्योतिष आणि धार्मिक

Shukra Gochar 2025 : तीन दिवसांनंतर ‘या’ राशींवर शुक्र देवाची राहील कृपा; प्रत्येक कामात लाभेल यश!

शुक्र ग्रह ९ डिसेंबर रोजी करणार ज्‍येष्‍ठा नक्षत्रात प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

Shukra Nakshatra Parivartan 2025: धन-वैभव, सुख-समृद्धी आणि प्रेमाचा कारक अशी शुक्र ग्रहाची ज्योतिषशास्त्रात ओळख आहे. एका विशिष्ट कालावधीनंतर हा ग्रह राशीसोबत नक्षत्रात परिवर्तन करतो. ज्योतिषशास्त्रानुसार, या ग्रहाने केलेल्‍या परिवर्तनाचा परिणाम १२ राशींसह विविध घडामोडींवरही दिसून येतो. सध्या वृश्चिक राशीत असलेला शुक्र, ९ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजून ३४ मिनिटांनी ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करेल. नक्षत्रात तो २० डिसेंबरपर्यंत राहणार आहे. हा बदल काही विशिष्ट राशींसाठी विशेषतः लाभदायक ठरू शकतो. जाणून घेवूया या भाग्यवान राशींबद्दल...

सिंह

सिंह राशींच्‍या जातकांना मिळेल अनेक गोष्‍टींमध्‍ये लाभ

सिंह राशीच्या जातकांना शुक्राचे ज्येष्ठा नक्षत्रातील गोचर अनेक बाबतीत लाभ देऊ शकते. शुक्र या राशीच्या चौथ्या भावात भ्रमण करेल. भौतिक सुखांची प्राप्ती होऊ शकते. कुटुंबासोबत आनंदात वेळ व्‍यतित कराल. करिअरमध्‍ये मोठा फायदा मिळू शकतो. कामानिमित्त घडणारे प्रवासही लाभदायक ठरतील. व्‍यापारात चांगला नफा नफा मिळू शकतो. नवीन ऑर्डर्स मिळण्याची शक्यता आहे. व्‍यवसयातील गुंतवणूक फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवन चांगले राहील.

कन्या

कन्‍या राशीच्‍या जातकांना मिळेल नशीबाची साथ

कन्या राशीच्या गोचर कुंडलीत शुक्र ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करून तिसऱ्या भावात विराजमान होईल. यामुळे या जातकांना अनेक क्षेत्रांतून बंपर लाभ मिळू शकतो. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. कन्‍या राशीच्‍या नोकरदार जातकांना लाभा होईल. आपले वरिष्ठ अधिकार्‍यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. मित्र आणि कुटुंबाचीही पूर्ण साथ मिळल्‍याने आपले लक्ष्य साध्य करण्यात यशस्वी व्‍हाल.

मकर

मकर राशीच्‍या जातकांच्‍या होणार अनेक इच्छा पूर्ण

शुक्र ज्येष्ठा नक्षत्रात प्रवेश करून या राशीच्या गोचर कुंडलीतील अकराव्या भावात भ्रमण करेल. यामुळे या राशीच्या जातकांच्या अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. परदेशात नोकरी किंवा व्यवसायाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. नोकरदारांना त्‍यांच्‍या मेहनतीचे फळ म्हणून पदोन्नती आणि बोनस मिळू शकतो. व्यापारात मोठा लाभ होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत सापडतील.प्रेम जीवन चांगले राहील.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT