प्रातिनिधिक छायाचित्र. 
ज्योतिष आणि धार्मिक

Ketu Gochar 2026 : 'या' राशींवर २०२६ मध्ये असेल केतू ग्रहाची विशेष कृपा : अपार धन आणि पद-प्रतिष्ठा मिळण्याचा योग

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार केतुचे वर्षभरातील तीन नक्षत्र भ्रमणांचा जगभर जाणवणार परिणाम

पुढारी वृत्तसेवा

Ketu Gochar 2026: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार २०२६ मध्ये अनेक छोटे-मोठे ग्रह राशी बदल करतील. याचा परिणाम मानवी जीवनांसह विविध देशांवरही दिसून येईल. वर्षातून एकदा होणारे ग्रहांचे राशी परिवर्तन मोठे मानले जाते, पण नक्षत्रांमधील बदलही काही राशींसाठी विशेष फलदायी ठरू शकतात. वर्षाची सुरुवात केतु ग्रह पूर्वाफाल्गुनी नक्षत्रात संचार करून करेल. २९ मार्च रोजी केतु मघा नक्षत्रात प्रवेश करेल.त्यानंतर, ५ डिसेंबर रोजी केतु कर्क राशीच्‍या अश्लेषा नक्षत्रात गोचर करणार आहे. एकाच वर्षात केतु ग्रह तीन वेगवेगळ्या नक्षत्रांमध्ये संचार करेल. केतु ग्रहाचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींसाठी अत्यंत शुभ फलदायी ठरू शकते.प्रामुख्याने तीन राशींना या काळात अचानक धनलाभ आणि मोठी प्रगती होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया 'या' भाग्यवान राशी कोणत्या आहेत...

मकर

मकर राशीच्‍या जातकांसाठी ठरणार अत्‍यंत लाभदायक

मकर राशीच्या लोकांसाठी केतू ग्रहाचे गोचर अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकते. केतू ग्रह तुमच्या राशीतून सप्तम भावात गोचर करणार आहे. त्यामुळे या काळात तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल. अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. गुंतवणुकीतून लाभ मिळण्याचे योग तयार होत आहेत. वैवाहिक जीवन आनंदी राहील.अविवाहित लोकांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे मार्ग खुले होतील. आर्थिक लाभाची प्रबळ स्थिती निर्माण होईल.

तूळ

तूळ राशीच्‍या जाताकांच्‍या करिअरमध्‍ये होईल प्रगती

केतू ग्रहाचा राशी बदल तू राशीच्या जातकांसाठी शुभ फलदायी ठरू शकतो. केतू ग्रह तुमच्या राशीतून दशम भावात (कर्म स्थान) संचार करेल. कार्यक्षेत्रात मोठी प्रगती होईल. नोकरदार लोकांची पदोन्नती होण्याची शक्यता आहे. स्वतःचा व्यवसाय असणार्‍यांची प्रगती होईल. नवीन प्रकल्प मिळण्याचे योग दिसत आहेत. करिअरमध्ये यश मिळेल आणि कार्यक्षेत्रात प्रगतीचे नवे मार्ग प्रशस्त होतील. तुम्ही काही मोठे निर्णय घेऊ शकता. कुटुंबातील ज्‍येष्‍ठांशी संबंध चांगले राहतील.

कन्‍या राशीच्‍या जातकांच्‍या उत्‍पन्‍नात होईल वाढ

कन्या राशीच्या लोकांसाठी केतू ग्रहाचा राशी बदल सकारात्मक सिद्ध होऊ शकतो. हे गोचर तुमच्या राशीतून उत्पन्न आणि लाभाच्या स्थानी (एकादश भाव) होणार आहे. त्यामुळे या काळात तुमच्या उत्पन्नात जबरदस्त वाढ होऊ शकते. उत्पन्नाचे नवनवीन स्रोत तयार होतील. करिअरमध्ये अचानक प्रगती होईल. नवीन संधी मिळतील. मालमत्तेसंबंधित लाभ मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून चांगला फायदा होईल. लॉटरीमध्‍ये नशीब आजमविणार्‍यांसाठी हा काळ अनुकूल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT