Unemployment Rate Pudhari
अर्थभान

Unemployment Rate: बेरोजगारी दर वाढला; शहरांमध्ये परिस्थिती गंभीर… भारताची अर्थव्यवस्था संकटात?

India Unemployment Rate Rises in March: मार्च महिन्यात बेरोजगारी दर वाढून तो 15.2% वर पोहोचला आहे. शहरी भागात रोजगाराच्या संधी कमी झाल्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

India Unemployment Rate Rises in March: जागतिक स्तरावर आर्थिक अनिश्चितता कायम असताना भारतात बेरोजगारीचं संकट वाढलं आहे. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या (MoSPI) पिरिओडीक लेबर फोर्स सर्वेच्या (PLFS) अहवालानुसार, मार्च महिन्यात बेरोजगारीचा दर वाढल्याचे दिसून आले आहे.

तरुणांमध्ये बेरोजगारीत झपाट्याने वाढ

अहवालानुसार, 15 ते 29 वयोगटातील तरुणांमध्ये बेरोजगारी दर मार्चमध्ये 15.2 टक्क्यांवर पोहोचला आहे. फेब्रुवारीत हा दर 14.8 टक्के होता. म्हणजेच एका महिन्यातच यात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, हा दर गेल्या 9 महिन्यांतील सर्वाधिक आहे. याआधी जून 2025 मध्ये हा दर 15.3 टक्के होता.

एकूण बेरोजगारीतही वाढ

फक्त तरुणच नाही, तर एकूण बेरोजगारी दरही वाढला आहे. 15 वर्षांवरील लोकांमध्ये बेरोजगारी दर मार्चमध्ये 5.1% झाला आहे, फेब्रुवारीत तो 4.9% होता. म्हणजे रोजगाराच्या संधी कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत.

शहरांमध्ये परिस्थिती अधिक गंभीर

या अहवालातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शहरी भागातील परिस्थिती.

  • ग्रामीण भागात बेरोजगारी 13.6% आहे

  • शहरी भागात बेरोजगारी 18.4% आहे

यावरून स्पष्ट होतं की शहरांमध्ये नोकरीच्या संधी अधिक वेगाने कमी होत आहेत.

पुरुष आणि महिलांमध्ये काय स्थिती?

  • पुरुष (15-29 वर्षे): 14.3% (फेब्रुवारीत 13.7%)

  • महिला: 17.7% (फेब्रुवारीत 17.6%)

महिलांमध्ये बेरोजगारीचा दर आधीच जास्त होता आणि तो अजून वाढताना दिसत आहे.

लेबर फोर्स पार्टिसिपेशनमध्येही घट

फक्त बेरोजगारीच नाही, तर काम करण्यासाठी येणाऱ्या लोकांची संख्या देखील कमी होत आहे.

  • Labour Force Participation Rate (LFPR) मार्चमध्ये 55.4%

  • फेब्रुवारीत 55.9%

  • महिलांचा सहभाग कमी झाला आहे: 35.3% वरून 34.4%

याचा अर्थ, अनेक लोक नोकरी शोधण्याचाही प्रयत्न करत नाहीत.

अर्थव्यवस्थेसाठी इशारा?

हे आकडे काही महत्त्वाचे प्रश्न निर्माण करतात:

  • अर्थव्यवस्थेचा वेग कमी होतोय का?

  • शहरांमध्ये रोजगार निर्मिती थांबतेय का?

  • तरुणांसाठी संधी कमी होत आहेत का?

विशेषतः शहरी बेरोजगारी वाढणे हा अर्थव्यवस्थेसाठी धोका मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT