Wipro Out Nifty 50 BSE In: शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनासाठी एक मोठी बातमी आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टी ५० इंडेक्समधील सामील शेअर्समध्ये मोठा बदल होणार आहे. जवळपास तीन दशके निफ्टी - ५० मध्ये सामील असलेली आयटी सेक्टरमधील मोठी कंपनी विप्रो लिमिटेड निफ्टी ५० मधून बाहेर होणार आहे. त्याच्या जागी आता बीएसई लिमिटेड कंपनीची एन्ट्री होणार आहे. या बदलाचा थेट परिणाम हा विप्रो आणि बीएसईच्या शेअर्सवर दिसणार आहे. मंगळवारी मार्केट ओपन झाल्यानंतर विप्रोच्या शेअर्समध्ये किरकोळ तेजी होती. तर बीएसईच्या शेअर्समध्ये छोटी घसरण झाली होती.
निफ्टी इंडेक्समधील हा नवा बदल पुढच्या महिन्यात सप्टेंबरपासून लागू होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार २९ सप्टेंबरला शेअऱ मार्केटचे कामकाज बंद झाल्यानंतर विप्रोचा निफ्टी - ५० सोबतचा तीन दशक जुना प्रवास संपुष्टात येणार आहे. ३० सप्टेंबरपासून विप्रो निफ्टी ५० मधून बाहेर केली जाणार आहे. एनएसईकडून सोमवारी सहामाही आढावा घण्यात आला. त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
गेल्या तीन दशकापासून निफ्टी ५० मध्ये असणारी आयटी कंपनी विप्रो आता यातून का बाहेर केली जात आहे हा प्रश्न विचारला जात आहे. गेल्या सहा महिन्यांपासून विप्रोची फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल खूप कमी झाली होती. ती जवळपास ५५,९३० कोटी रूपये इतकी कमी झाली होती. त्याच्या तुलने बीएसई लिमिटेडची फ्री फ्लोट मार्केट कॅप याच काळात वाढून १.४ लाख कोटी रूपयांपर्यंत पोहचली. यामुळं विप्रो निफ्टी ५० मधून बाहेर पडली अन् बीएसई कंपनीची निफ्टी ५० मध्ये एन्ट्री झाली आहे.
Wipro आणि BSE बाबत आलेल्या या बातमीचा थेट परिणाम हा शेअर बाजारात दिसणार आहे. येत्या काही दिवसात या दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सवर परिणाम होण्याची शक्यात आहे. मंगळवारी शेअर मार्केट उघडताच विप्रोचे शेअर १८६ रूपयांवर ओपन झाले. गेल्या एका वर्षात या आयटी कंपनीच्या शेअर्समध्ये २३ टक्क्यांची घट झाली आहे. तर गेल्या पाच वर्षात या कंपनीने गुंतवणूकदारांसाठी ४० टक्के निकेटिव्ह रिटर्न्स दिले आहेत.
दुसरीकडे बीएसई शेअर्स मंगळवारी थोड्या घसरणीसह व्यवसाय करताना दिसत होते. हे शेअर्स ३५६५ रूपयांवर ट्रेड करत होते. या शेअर्सने गेल्या वर्षभरात गुंतवणूकदारांना ५० टक्के सकारात्मक रिटर्न्स दिले आहेत. पाच वर्षात या कंपनीच्या शेअर्सने तब्बल २७०० टक्क्यापेक्षा जास्त रिटर्न्स दिले आहेत.