Who is Kunal Shah Appointed as WhatsApp Chief: जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp च्या नेतृत्वात मोठा बदल झाला आहे. Meta ने CRED चे संस्थापक कुणाल शाह यांची WhatsApp च्या नव्या प्रमुखपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली आहे. जवळपास सात वर्षे WhatsApp चे नेतृत्व करणारे विल कॅथकार्ट आता पद सोडणार असून ते Meta मधील नव्या प्लॅटफॉर्मच्या विकासावर लक्ष देणार आहेत.
या नियुक्तीसोबतच Meta ने भारतीय फिनटेक कंपनी CRED मध्ये सुमारे 900 दशलक्ष डॉलरची (सुमारे 8,550 कोटी) गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय स्टार्टअप क्षेत्रासाठी आणि जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रासाठी ही अत्यंत महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.
Meta चे CEO मार्क झुकरबर्ग यांनी कुणाल शाह यांच्या नियुक्तीचे स्वागत करताना म्हटले की, "कुणाल यांनी CRED ला भारतातील महत्त्वाच्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक बनवले आहे. त्यांची दृष्टी, कल्पना आणि विचारसरणी WhatsApp च्या भविष्यासाठी उपयुक्त ठरेल."
WhatsApp आज जगभरातील 3 अब्जांहून अधिक युजर्सना सेवा देत आहे. भारतातच या अॅपचे 50 कोटींपेक्षा जास्त युजर्स आहेत. त्यामुळे WhatsApp चे नेतृत्व करणारी व्यक्ती जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींमध्ये गणली जाते.
कुणाल शाह हे भारतातील सर्वात प्रसिद्ध स्टार्टअप उद्योजकांपैकी एक आहेत.
जन्म : मुंबई
शिक्षण : तत्त्वज्ञान विषयात पदवी (मुंबईतील विल्सन कॉलेज)
पोस्ट ग्रॅज्युएशन : त्यांनी नरसी मोंजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (NMIMS) मधून एमबीए (MBA) करण्यासाठी प्रवेश घेतला होता. मात्र, व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी ते अर्धवट सोडले
करिअरची सुरुवात : FreeCharge या डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मद्वारे
FreeCharge कंपनीची ची विक्री झाली : 2015 मध्ये Snapdeal ने खरेदी केली
2018 मध्ये CRED ची स्थापना
CRED हे मुख्यतः क्रेडिट कार्ड बिल वेळेवर भरणाऱ्या ग्राहकांसाठी रिवॉर्ड्स देणारे प्लॅटफॉर्म आहे. पुढे कंपनीने कर्ज, विमा, गुंतवणूक आणि आर्थिक सेवा क्षेत्रातही विस्तार केला. कुणाल शाह हे भारतातील एंजल इन्व्हेस्टर्सपैकी एक मानले जातात. त्यांनी शेकडो स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली आहे.
Meta ने CRED मध्ये सुमारे 900 दशलक्ष डॉलर म्हणजेच जवळपास 8,550 कोटींची गुंतवणूक केली आहे.
या व्यवहारामुळे:
CRED चे मूल्यांकन 4.5 अब्ज डॉलरवर पोहोचले
Meta कडे कंपनीतील सुमारे 20% हिस्सा असेल
मात्र Meta ला CRED युजर्सचा वैयक्तिक डेटा मिळणार नाही
कुणाल शाह Meta मध्ये जाणार असल्याने CRED च्या दैनंदिन कामकाजाची जबाबदारी आता मितेन संपत यांच्याकडे देण्यात आली आहे. मितेन संपत हे 2020 पासून CRED मध्ये स्ट्रॅटेजी आणि फायनान्स विभागाचे नेतृत्व करत होते. ते सध्या अंतरिम CEO म्हणून काम पाहतील.
Meta सध्या WhatsApp ला केवळ मेसेजिंग अॅप न ठेवता एक मोठे डिजिटल प्लॅटफॉर्म बनवण्याच्या दिशेने काम करत आहे.
यामध्ये:
WhatsApp Pay चा विस्तार
AI आधारित सेवा
बिझनेस मेसेजिंग
जाहिरात आणि सबस्क्रिप्शन मॉडेल
ई-कॉमर्स सुविधा
या सर्व क्षेत्रांमध्ये वाढ करण्याची जबाबदारी कुणाल शाह यांच्यावर असेल.
भारत हा WhatsApp साठी सर्वात मोठा बाजार आहे. त्यामुळे भारतीय उद्योजकाला WhatsApp चे नेतृत्व देणे हा Meta चा भारतावरील वाढता विश्वास मानला जात आहे.
WhatsApp Pay ला UPI क्षेत्रात अजून मोठा बाजारातील हिस्सा मिळवायचा आहे. सध्या PhonePe आणि Google Pay या कंपन्यांचे वर्चस्व आहे. कुणाल शाह यांच्या फिनटेक अनुभवाचा फायदा WhatsApp Pay ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2018 मध्ये सुरू झालेल्या CRED ने अवघ्या काही वर्षांत मोठी झेप घेतली आहे.
1.7 कोटींहून अधिक सदस्य
सुमारे 24,000 कोटींचे कर्ज पोर्टफोलिओ
वार्षिक महसूल 3,200 कोटींच्या आसपास
कंपनी भविष्यात IPO आणण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे.
WhatsApp च्या इतिहासात पहिल्यांदाच एका भारतीय उद्योजकाकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली आहे. FreeCharge पासून CRED पर्यंत यशस्वी प्रवास करणारे कुणाल शाह आता जगातील सर्वात मोठ्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मचे नेतृत्व करणार आहेत.