Who Is Arif Habib? Tycoon Who Bought PIA: पाकिस्तानच्या आर्थिक अडचणींचं सर्वात मोठं उदाहरण म्हणजे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाईन्स (PIA). अखेर ही कंपनी सरकारला विकावी लागली. इस्लामाबादमध्ये झालेल्या बोली प्रक्रियेत प्रसिद्ध उद्योगपती आरिफ हबीब यांच्या समूहाने तब्बल 135 अब्ज पाकिस्तानी रुपयांना PIA मधील 75 टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. कधीकाळी जागतिक पातळीवर नाव असलेल्या या एअरलाईनला सरकारच्या दुर्लक्षामुळे आणि गैरव्यवस्थापनामुळे प्रचंड तोटा सहन करावा लागला.
या व्यवहारानुसार आरिफ हबीब समूहाला उर्वरित 25 टक्के हिस्सेदारी खरेदीसाठी 90 दिवसांचा कालावधी मिळणार आहे. याशिवाय, पुढील पाच वर्षांत सुमारे 80 अब्ज पाकिस्तानी रुपये गुंतवणूक करण्याची अटही या करारात आहे. त्यामुळे PIA च्या पुनरुज्जीवनाची जबाबदारी आता खासगी क्षेत्राकडे आहे.
आरिफ हबीब हे पाकिस्तानमधील अत्यंत प्रभावी आणि श्रीमंत उद्योगपती आहेत. 1953 मध्ये जन्मलेल्या हबीब यांनी फार कमी वयात व्यवसायाची सुरुवात केली. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी 1970 साली ब्रोकरेज व्यवसायात एन्ट्री केली आणि हळूहळू स्वतःचं व्यावसायिक साम्राज्य उभं केलं.
आज Arif Habib Group हा पाकिस्तानमधील एक मोठा मल्टी-सेक्टर समूह आहे. या समूहाचं काम
– फायनान्शियल सर्व्हिसेस
– केमिकल्स
– सिमेंट
– स्टील
– रिअल इस्टेट
– ऊर्जा क्षेत्र
अशा विविध क्षेत्रांमध्ये पसरलेलं आहे. फातिमा फर्टिलायझर, आयशा स्टील मिल्स, जावेदन कॉर्पोरेशन यांसारख्या मोठ्या कंपन्या या समूहाअंतर्गत येतात.
आरिफ हबीब यांचं भारताशीही एक भावनिक नातं आहे. एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार, त्यांच्या पालकांचा व्यवसाय चहाच्या व्यापाराशी संबंधित होता. 1948 साली फाळणीनंतर ते भारतातील गुजरात राज्यातील बंटवा या गावातून पाकिस्तानात स्थलांतरित झाले.
कराचीमध्ये जन्मलेल्या आरिफ हबीब यांचं कुटुंब सुरुवातीला आर्थिक अडचणीत होतं. 1970 मध्ये त्यांच्या मोठ्या भावाने शेअर बाजारातील ट्रेडिंग लायसन्स घेतलं आणि त्यावेळी अवघ्या 17 व्या वर्षी आरिफ हबीब यांनी शिक्षण थांबवून ब्रोकरेज व्यवसायात प्रवेश केला.
PIA खरेदीमुळे आरिफ हबीब पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संघर्षातून उभं राहिलेलं व्यक्तिमत्त्व आज पाकिस्तानच्या सरकारी एअरलाईनचं भवितव्य ठरवणार आहे. पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेतील ही मोठी घडामोड असून, PIA पुन्हा उभारी घेते का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.