VIP Industries shares (file photo)
अर्थभान

VIP Industries shares | प्रमोटर्स १५ टक्के स्वस्त किमतीत विकताहेत हिस्सा, शेअर्स ५ टक्के घसरला, गुंतवणूकदारांमध्ये खळबळ

प्रमोटर्स होल्डिंगमध्ये मोठा बदल जाहीर झाल्यानंतर VIP Industries शेअर्समध्ये घसरण झाली आहे

दीपक दि. भांदिगरे

VIP Industries shares

व्हीआयपी इंडस्ट्रीजा शेअर्स सोमवारी (दि. १४ जुलै) ५ टक्क्यांपर्यंत घसरला. प्रमोटर होल्डिंगमध्ये मोठा बदल जाहीर झाल्यानंतर या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. दिलीप पिरामल (Dilip Piramal) हे व्हीआयपी इंडस्ट्रीजचे प्रमुख आहेत. व्हीआयपी इंडस्ट्रीज ही अनेक दशकांपासून भारतातील आघाडीच्या लगेज ब्रँडपैकी एक म्हणून ओळखली जाते. पण दिलीप पिरामल आणि त्यांचे कुटुंबीय व्हीआयपी इंडस्ट्रीजमधील ३२ टक्क्यांपर्यंतचा हिस्सा विकण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर हा शेअर्स गडगडला आहे.

याबाबत नुकताच एक करार झाला. याबाबत दिलीप पिरामल आणि त्यांच्या कुटुंबाने सांगितले की ते व्हीआयपी इंडस्ट्रीजमधील ३२ टक्के हिस्सा मल्टीपल्स प्रायव्हेट इक्विटी फंड IV च्या नेतृत्वाखालील एका कन्सोर्टियमला तसेच संविभाग सिक्युरिटीज आणि संचेती सिक्युरिटीजना विकतील.

हा व्यवहार १,७६३ कोटी रुपयांचा आहे. याचे मूल्य प्रति शेअर ३८८ रुपये आहे. जे VIP इंडस्ट्रीज शेअर्सच्या (शुक्रवारच्या सत्रातील बंद दर) किमतीपेक्षा १५ टक्के सवलतीत आहे.

बाजार नियामक सेबीच्या सबस्टेंशियल ॲक्विझिशन ऑफ शेअर्स अँड टेकओव्हर्स (SAST) नियमांनुसार, हा व्यवहार ओपन ऑफरच्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. ३२ टक्के हिस्सा खरेदी केल्यानंतर खरेदीदार कन्सोर्टियम सार्वजनिक शेअर्सहोल्डर्सकडून आणखी २६ टक्के हिस्सा मिळवण्यासाठी ऑफर देतील. यामुळे कंपनीचे एकूण ॲक्विझिशन ५८ टक्क्यांपर्यंत पोहोचेल.

खरेदीदारांना किती मिळतील शेअर्स

या व्यवहारानुसार, खरेदीदारांना कंपनीचे ४.५४ कोटी शेअर्स मिळतील. जे एकूण इक्विटीच्या सुमारे ३२ टक्के आहेत. तसेच या व्यवहारानंतर त्यांना संचालक मंडळावरील बहुतांक संचालकांना नामांकित करण्याचा अधिकार मिळणार आहे.

व्हीआयपी इंडस्ट्रीजचा शेअर्सची स्थिती काय?

व्हीआयपी इंडस्ट्रीजचा शेअर्स शुक्रवारी १.६ टक्के वाढीसह ४५६ रुपयांवर बंद झाला होता. सोमवारी (दि. १४ जुलै) हा शेअर्स ५ टक्के घसरणीसह ४३१ रुपयांपर्यंत खाली आला. त्यानंतर तो काही प्रमाणात सावरत २ टक्के घसरणीसह ४४६ रुपयांवर व्यवहार करत आहे. गेल्या एका महिन्यात या शेअर्समध्ये १२ टक्के वाढ झाली. तर ६ महिन्यांत हा शेअर्स ७ टक्क्यांहून अधिक वाढला. या कंपनीचे बाजार भांडवर सुमारे ६,४८० कोटी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT