UPI payment File Photo
अर्थभान

UPI payment: ४ सप्टेंबरला UPI सेवा बंद राहणार? 'या' वेळेत करता येणार नाही पेमेंट

शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी काही काळासाठी UPI व्यवहार बंद राहणार आहेत. कोणत्या बँकेची UPI सेवा बंद होईल आणि पुन्हा कधी सुरू होणार, जाणून घ्या सविस्तर...

पुढारी वृत्तसेवा

UPI payment news

नवी दिल्ली : शुक्रवार, ४ सप्टेंबर रोजी काही काळासाठी UPI व्यवहार बंद राहणार आहेत. बँकेने जाहीर केलेल्या माहितीनुसार, देखभाल-दुरुस्तीच्या कामामुळे UPI व्यवहार करता येणार नाहीत. त्यामुळे या कालावधीत डिजिटल पेमेंट करताना ग्राहकांना अडचणी येऊ शकतात. कोणत्या बँकेची UPI सेवा बंद होईल आणि पुन्हा कधी सुरू होणार, जाणून घ्या सविस्तर...

कोणत्या बँकेची UPI सेवा बंद राहील?

स्टेट बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर रोजी रात्री १२.१५ ते १ वाजेपर्यंत UPI सेवा बंद राहणार आहे. म्हणजेच तुम्ही एकूण ४५ मिनिटांसाठी SBI द्वारे UPI पेमेंट्स करू शकणार नाही. मात्र , बँकेने स्पष्ट केले आहे की जर देखभालीचे काम नियोजित वेळेपूर्वी पूर्ण झाले, तर सेवा नियोजित वेळेपेक्षा लवकर पूर्ववत केल्या जातील.

कोणते व्यवहार करता येणार नाहीत?

UPI सेवा बंद असलेल्या ४५ मिनिटांच्या कालावधीत मोठ्या रकमेचे UPI व्यवहार करता येणार नाहीत. मात्र, ग्राहकांना UPI Lite चा वापर करता येईल. UPI Liteच्या माध्यमातून PIN न टाकता १,००० रुपयांपर्यंतचा छोटा व्यवहार करता येतो. तसेच UPI Lite मध्ये कमाल ५,००० रुपये शिल्लक ठेवता येतात.

UPI व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार?

सरकार UPI व्यवहारांवर MDR (मर्चंट डिस्काउंट रेट) आकारण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. सप्टेंबरच्या मध्यापर्यंत याबाबत अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. मात्र, सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की, सामान्य जनतेला कोणतेही अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही; हे शुल्क केवळ मोठ्या व्यापाऱ्यांसाठी लागू असेल.

SBI UPI मधून किती रुपयांचा व्यवहार करता येतो?

SBI UPIच्या माध्यमातून सामान्यतः दररोज १ लाख रुपयांपर्यंत व्यवहार करता येतो. मात्र, व्यवहाराच्या प्रकारानुसार ही मर्यादा वेगळी असू शकते. कॅपिटल मार्केट आणि विमा व्यवहारांसाठी २ लाख रुपयांपर्यंत, तर IPO, कर भरणा तसेच शाळा-महाविद्यालयाची फी भरण्यासाठी ५ लाख रुपयांपर्यंत UPI व्यवहार करता येतो. त्यामुळे ४ सप्टेंबरच्या रात्री UPI वर अवलंबून असलेल्या SBI ग्राहकांनी महत्त्वाचे व्यवहार असल्यास त्यांचे नियोजन आधीच करून ठेवणे योग्य ठरेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT