Nirmala Sitharaman Budget Saree x account
अर्थभान

Nirmala Sitharaman Budget Saree : मरून रंगाची साडी अन्‌ शॉल...नेहमीपेक्षा खास आहे सीतारमण यांनी नेसलेली साडी

Nirmala Sitharaman Budget Saree : मरून रंगाची साडी अन्‌ शॉल...नेहमीपेक्षा खास आहे सीतारमण यांनी नेसलेली साडी

स्वालिया न. शिकलगार

अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांच्या साड्यांकडे नेहमीच विशेष लक्ष दिलं जातं. यंदा त्यांनी मरून रंगाची साडी आणि त्यावर शाल परिधान करत साधा पण उठावदार लूक साकारला. त्यांच्या या पारंपरिक आणि अर्थपूर्ण पोशाखाने सोशल मीडियावर मोठी चर्चा निर्माण केली आहे.

Union Budget 2026 Nirmala Sitharaman Budget special Saree

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर करण्यापूर्वी अर्थ मंत्रालयात पोहोचल्या. निर्मला सीतारमण आज ११ वाजता केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सादर करतील. हा त्यांचा सलग ९ वा बजेट असेल. अर्थसंकल्प दिनी निर्मला सीतारमण यांनी नेसलेली साडी नेहमीच चर्चेत राहते. खरंतर, अर्थसंकल्प दिनी त्या जी साडी नेसतात, ती खूप खास साडी अशते, ज्यामध्ये भारतीय संस्कृतीची झलक दिसते.

यंदाची साडीही खास आहे. आज अर्थसंकल्प सादर करण्यासाठी जी साडी निर्मला सीतारमण यांनी नेसली आहे, ती गडद मरून रंगाची आहे. नेहमीसारखा साध्या लूकमध्ये त्या दिसल्या.

मरून रंगाच्या साडीची ही आहे खासियत

निर्मला सीतारमण यांनी आजच्या अर्थसंकल्प दिनी हँडलूम गडद मरून रंगाची कांचीवरम सिल्क साडी नेसली. तामिळनाडूची सर्वात जुनी विणकाम केलेली ही साडी आहे. साडीमध्ये हलक्या सोनेरी रंगाचे चेक्स म्हणजेच कट्टम आणि धाग्यांचे विणकामसह कॉफी कलर ब्राऊन बॉर्डर आहे. (कट्टम या शब्दाचा अर्थच जाड किनार किंवा ठसठशीत काठ असा होतो)

काय आहे कट्टम साडी?

कट्टम साडी ही प्रामुख्याने आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील पारंपरिक साडी आहे. या साडीची खास ओळख म्हणजे तिच्या जाड, ठळक आणि रंगीत बॉर्डर. रेशीम (सिल्क) किंवा कॉटन-सिल्क मिश्रण, बॉर्डरवर सोनेरी किंवा चंदेरी झरीचे काम, पारंपरिक पण तरीही एलिगंट लूक दिसतो. कट्टम साड्यांमध्ये सहसा लाल-हिरवा, मोरपंखी-गुलाबी, निळा-पिवळा, मरून-सोनेरी हे कलर दिसतात. कट्टम साड्या मुख्यत धर्मावरम, मंगलगिरी, उप्पाडा, पोचमपल्ली याठीकाणी बनवली जाते. त्याची किंमत ३ हजार पासून २० हजार आणि त्याहून अधिक असते.

याआधीचीही साडी तितकीच स्पेशल

या आधी त्यांनी २०२५ मध्ये बिहारची 'मधुबनी कला' असलेली ऑफ-व्हाईट सिल्क साडी नेसली होती. ही साडी त्यांना पद्म पुरस्कार विजेत्या दुलारी देवी यांनी त्यांना गिफ्ट केली होती. साडीवर 'माशांचे' डिझाईन होते. ही डिझाईन म्हणजे सुख, समृद्धी आणि विकासाचे प्रतीक होते.

निर्मला सीतारमण यांच्याविषयी जाणून घ्या ...

निर्मला सीतारमण यांचा जन्म १८ ऑगस्ट, १९५९ रोजी मदुराई, तमिळनाडूमध्ये झाला होता. त्य़ांनी तिरुचिरापल्लीच्या सीतालक्ष्मी रामास्वामी कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदवी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून अर्थशास्त्रातून पदव्युत्तर पदवी मिळवलीय. राजकारणात येण्यापूर्वी त्या कॉर्पोरेट क्षेत्रात होत्या. २००६ मध्ये भारतीय जनता पार्टी (भाजपा) सोबत त्यांचा राजकीय प्रवास सुरु झाला होता. २०१४ मध्ये त्यांना मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात जागा मिळाली होती. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात त्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या स्वतंत्र प्रभारी मंत्री होत्या. २०१७ मध्ये निर्मला सीतारमण संरक्षण मंत्री होत्या. २०१९ पासून त्यांच्याकडे अर्थमंत्री पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT