Thalapathy Vijay  Pudhari
अर्थभान

Thalapathy Vijay Net Worth: आलिशान गाड्या, घर, सोनं, हिरे, बँक बॅलन्स.... थलपती विजयची संपत्ती किती?

Thalapathy Vijay Net Worth 2026: थलपती विजयने निवडणूक अर्जासोबत सुमारे 404 कोटींच्या संपत्तीचा खुलासा केला आहे. त्याच्या बँक खात्यातच 213 कोटी रुपये असून लक्झरी कार्स आणि दागिन्यांचाही मोठा साठा आहे.

पुढारी वृत्तसेवा

Thalapathy Vijay Net Worth 2026: तमिळ सिनेसृष्टीतील सुपरस्टार थलापती विजय आता राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. 2026 च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत उमेदवारी जाहीर करताना त्याने आपल्या संपत्तीचा तपशील सादर केला आणि त्यानंतर त्याच्या संपत्तीची चर्चा देशभरात रंगली आहे.

राजकारणात एंट्री आणि संपत्तीचा खुलासा

विजयने आपल्या तमिलगा वेत्री कळघम (TVK) पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगाच्या नियमांनुसार संपत्तीचा सविस्तर तपशील दिला. सादर केलेल्या माहितीनुसार, विजयच्या नावावर सुमारे 404.58 कोटी रुपयांची चल संपत्ती आहे.

त्याची पत्नी संगीता सोरणालिंगम यांच्या नावावरही सुमारे 15.51 कोटी रुपयांची संपत्ती आहे. ही आकडेवारी समोर आल्यानंतर त्याच्या संपत्तीबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.

बँक खात्यातच 200 कोटींपेक्षा जास्त रक्कम

तपशीलानुसार Indian Overseas Bank मधील खात्यात सुमारे 213.36 कोटी रुपये, Axis Bank मध्ये सुमारे 5.79 कोटी रुपयांची FD, यावरून विजयची आर्थिक ताकद किती मोठी आहे, हे स्पष्ट होते.

लक्झरी कार्स आणि दागिन्यांचा खजिना

विजयच्या लक्झरी लाइफस्टाइलची झलकही या तपशीलातून दिसून येते. BMW 530, Toyota Vellfire यांसारख्या कार्ससह त्याच्या वाहनांची एकूण किंमत सुमारे 6 कोटी रुपये आहे. तसेच 883 ग्रॅम सोनं (1.20 कोटी रुपये), पत्नी संगीता यांच्याकडे 4 कोटींहून अधिक सोनं आणि कुटुंबाकडे सुमारे 1 कोटी रुपयांचे हिरे आहेत.

मोठ्या प्रमाणात गुंतवणूक

विजयकडे केवळ संपत्तीच नाही, तर त्याने विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकही केली आहे. कंपन्या, ट्रस्ट, संस्थांमध्ये, शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात एकूण 56 कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.

सिनेमातून राजकारणाकडे

वर्षानुवर्षे तमिळ सिनेमात सुपरस्टार राहिल्यानंतर विजयने आता राजकारणात एन्ट्री केली आहे. त्याच्या या निर्णयामुळे तमिळनाडूच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT