Stock Market Updates BSE Sensex
सेन्सेक्सवर आजही घसरण दिसून आली. file photo
अर्थभान

Stock Market Updates | बजेटनंतर बाजारात घसरण कायम, बँकिंग शेअर्सवर दबाव

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

केंद्रीय अर्थसंकल्पात भांडवली नफा करात वाढ केल्याच्या निर्णयाच्या एका दिवसानंतर भारतीय शेअर बाजारात बुधवारी (दि.२४) घसरण झाली. आज सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ घसरणीसह खुले झाले. पण त्यानंतर सकाळी १०.३० च्या सुमारास सेन्सेक्स २५० हून अधिक अंकांनी घसरुन ८०,२०० च्या खाली आला. तर निफ्टी २४,४५० च्या सपाट पातळीवर होता. बँकिंग आणि एफएमसीजी शेअर्समधील घसरणीने बाजाराला खाली ओढले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी (दि.२३) संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पातून फ्युचर्स आणि ऑप्शन्स सेंगमेंटवरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) मध्ये वाढ करण्याची घोषणा केली. त्यानंतर मंगळवारीही सेन्सेक्स, निफ्टी घसरले होते. आजही बाजारात घसरण कायम राहिली आहे.

कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्सवर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एम अँड एम, हिंदुस्तान युनिलिव्हर, नेस्ले इंडिया, ॲक्सिस बँक, अल्ट्राटेक सिमेंट, अदानी पोर्ट्स हे शेअर्स घसरले. तर टाटा मोटर्स, एनटीपीसी, टेक महिंद्रा, पॉवर ग्रिड, आयटीसी, टाटा स्टील हे शेअर्स तेजीत आहेत. बीएसई मिडकॅप ०.५ टक्क्यांनी वाढला आहे. स्मॉलकॅप १.५ टक्क्यांनी वाढून व्यवहार करत आहे.

निफ्टीवर टाटा कन्झ्यूमर, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एम अँड एम, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स १ ते २.५ टक्क्यांनी घसरले आहेत. तर ओएनजीसी, एचडीएफसी लाईफ, एसबीआय लाईफ, टाटा मोटर्स, एनटीपीसी हे शेअर्स २ ते ३.५ टक्क्यांनी वाढले आहेत.

परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीवर जोर

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (FII) २३ जुलै रोजी २,९७५ कोटी रुपयांच्या शेअर्स विक्री केली. तर याच दिवशी देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी १,४१८ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

SCROLL FOR NEXT