आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ८२,१२९ च्या नव्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. file photo
अर्थभान

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स- निफ्टीचा नवा रेकॉर्ड! कोणते शेअर्स तेजीत?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतीय शेअर बाजारात (Stock Market) गुरुवारी (दि.१) सलग पाचव्या सत्रांत तेजीचा माहौल कायम राहिला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने (Sensex) ८२,१२९ च्या नव्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. तर निफ्टीने (Nifty) २५ हजारांचा नवा उच्चांक गाठला. त्यानंतर सेन्सेक्स १२६ अंकांच्या वाढीसह ८१,८६७ वर बंद झाला. तर निफ्टी ५९ अंकांनी वाढून २५,०१० वर स्थिरावला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी सप्टेंबरमध्ये व्याजदर कपातीचे संकेत दिल्याच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी राहिल्याचे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

एनर्जी क्षेत्रात खरेदीवर जोर

क्षेत्रीय निर्देशांकात ऑटो, कॅपिटल गुड्स, आयटी, मीडिया, पीएसयू बँक आणि रियल्टी ०.५-२ टक्क्यांनी घसरले. तर मेटल, ऑईल आणि गॅस, पॉवर आणि एनर्जी क्षेत्रात खरेदी दिसून आली. बीएसई मिडकॅप ०.८ टक्के आणि स्मॉलकॅप ०.७ टक्क्याने घसरला.

सेन्सेक्सवर पॉवर ग्रिड, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, नेस्ले इंडिया, अदानी पोर्ट्स, मारुती, रिलायन्स हे शेअर्स १ ते ४ टक्क्यांपर्यंत वाढले. तर एम अँड एम, टाटा स्टील, बजाज फायनान्स, एसबीआय, एलटी, इन्फोसिस, टाटा मोटर्स, कोटक बँक हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले.

सेन्सेक्सवर पॉवर ग्रिडचा शेअर्स टॉप गेनर राहिला.

Nifty 50 निर्देशांक २५ हजारांवर

निफ्टीने आजच्या ट्रेडिंग सत्रात २५,०७८ चा नवा उच्चांक नोंदवला. निफ्टी निर्देशांक गेल्या काही दिवसांपासून २४ हजारांची पातळी ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. गेल्या सोमवारी त्याने २४,९९९.७५ पर्यंत चाल केली होती. त्याला २५ हजारांचा टप्पा गाठण्यास केवळ २५ बेसिस अंक कमी पडले होते. पण त्याने आज गुरुवारच्या सत्रात २५ हजारांवर झेप घेत सर्वकालीन उच्चांक नोंदवला. निफ्टीवर पॉवर ग्रिड, कोल इंडिया, ओएनजीसी, एचडीएफसी बँक, डॉ. रेड्डीज हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर एम अँड एम, टाटा स्टील, हिरो मोटोकॉर्प, ब्रिटानिया, टाटा मोटर्स हे शेअर्स टाप लूजर्स ठरले.

निफ्टीने आजच्या ट्रेडिंग सत्रात २५,०७८ चा नवा उच्चांक नोंदवला.

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने सलग आठव्यांदा व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. यूएस फेडने बेंचमार्क व्याजदर ५.२५ टक्के - ५.५० टक्के एवढा कायम ठेवला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT