Stock Market Updates
अमेरिकेच्या टॅरिफच्या निर्णयामुळे शेअर बाजारातील भावना कमकुवत झाल्या आहेत. परिणामी शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) सेन्सेक्स- निफ्टी घसरणीसह खुले झाले. सुरुवातीला सेन्सेक्स २५० अंकांच्या घसरणीसह ८१ हजारांच्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक ८२ अंकांनी घसरून २४,६०० वर व्यवहार करत आहे.
दरम्यान, FMCG शेअर्सवर खरेदीचा जोर कायम राहिला आहे. यामुळे निफ्टी एफएमसीजी निर्देशांक १.४ टक्के वाढला आहे.
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत तोटा नोंदवल्याच्या पार्श्वभूमीवर बीएसईवर स्विगीचा शेअर्स (Swiggy Share Price) जवळपास ४ टक्के घसरून ३८७ रुपयांपर्यंत खाली आला.
तर निव्वळ नफ्यात वाढ झाल्याने एनएसईवर आयशर मोटर्सचा शेअर्स २ टक्केहून अधिक वाढला.
सेन्सेक्सवर सन फार्माचा शेअर्स ४.४ टक्के घसरला आहे. त्याचबरोबर एम अँड एम, टाटा स्टील, टाटा मोटर्स, इन्फोसिस, एलटी, पॉवर ग्रिड हे शेअर्सही ०.५ ते १.५ टक्क्यांपर्यंत घसरणीसह खुले झाले आहेत. तर दुसरीकडे हिंदुस्तान युनिलिव्हरचा शेअर्स ३.६ टक्के वाढला आहे. आयटीसी, एशियन पेंट्स, कोटक बँक, मारुती हे शेअर्सही तेजीत आहेत.
अमेरिकेने त्यांच्या अनेक व्यापारी भागीदारी देशांवर जादा टॅरिफ लादले आहे. तसेच त्यांनी भारतीय आयातीवर २५ टक्के टॅरिफ लागू केले आहे. याचा दबाव बाजारात दिसून आला आहे. परिणामी सेन्सेक्स आणि निफ्टी५० घसरणीसह खुले झाले आहेत.