शेअर बाजारात आज मंगळवारी (दि. ३१) चढ-उतार दिसून आला.  (file photo)
अर्थभान

Stock Market | वर्षाअखेरच्या सत्रात बाजारात तीव्र चढ-उतार, 'या' शेअर्संनी दाखवली ताकद

IT शेअर्संना फटका, Pharma शेअर्स चमकले

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : शेअर बाजारात (Stock Market) आज मंगळवारी (दि. ३१) २०२४ वर्षाच्या अखेरच्या ट्रेडिंग सत्रात चढ-उतार दिसून आला. आज विशेषतः आयटी शेअर्संना मोठा फटका बसला. सेन्सेक्स (Sensex) सुरुवातीच्या ५०० अंकांच्या घसरणीतून सावरला आणि तो १०९ अंकांच्या घसरणीसह ७८,१३९ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) २३,६४४ च्या पातळीवर स्थिरावला.

फार्मा, पीएसयू बँक, ऑईल आणि गॅस शेअर्समधील तेजीमुळे बाजाराला काहीसा दिलासा मिळाला. पण मजबूत झालेला डॉलर इंडेक्स आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून सततच्या होत असलेल्या विक्रीमुळे बाजारात अस्वस्थता कायम राहिली. बीएसई मिडकॅप ०.१ टक्के आणि स्मॉलकॅप ०.७ टक्के वाढून बंद झाला.

IT शेअर्संना फटका

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने २०२५ वर्षात अपेक्षेपेक्षा कमी व्याजदर कपातीचे संकेत दिले आहेत. यामुळे अमेरिकेतून मिळणाऱ्या महसुलावर अवलंबून असलेल्या आयटी क्षेत्राला याचा फटका बसला आहे. आज आयटी निर्देशांक १.४ टक्के घसरून बंद झाला.

Sensex Today : कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्सवर टेक महिंद्राचा शेअर्स २.५ टक्के घसरून टॉप लूजर ठरला. त्याचबरोबर झोमॅटो, टीसीएस, इन्फोसिस, हिंदुस्तान युनिलिव्हर, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक हे शेअर्सही घसरले. तर कोटक बँकचा शेअर्स २.५ टक्के वाढला. आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा मोटर्स, टाटा स्टील, एसबीआय, एलटी हे शेअर्सही तेजीत राहिले.

निफ्टीवर अदानी एंटरप्रायजेचा शेअर्स २.४ टक्के घसरला. त्याचबरोबर टेक महिंद्रा, टीसीएस, इन्फोसिस हे शेअर्स १ ते २ टक्के घसरले. तर दुसरीकडे भारत इलेक्ट्रॉनिक्स, ओएनजीसी, कोटक बँक, ट्रेंट हे शेअर्स २ ते ३ टक्क्यांपर्यंत घसरले.

Adani Wilmar Share Price : अदानी विल्मर शेअर्स गडगडला

अदानी विल्मरचा शेअर्स ६ टक्के घसरला. अदानी एंटरप्रायजेस (AEL) ने सिंगापूरच्या विल्मर इंटरनॅशनलमधून बाहेर पडण्याची योजना जाहीर केली आहे. २ अब्ज डॉलर्स कराराचा भाग म्हणून ते कंपनीतील संपूर्ण ४४ टक्के हिस्सा विकत आहे. या पार्श्वभूमीवर अदानी विल्मरचा शेअर्स आज एनएसईवर ६ टक्के घसरून ३०९ रुपयांपर्यंत खाली आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT