सेन्सेक्सने आज ३०० अंकांनी वाढून ७९ हजारांच्या अंकाला स्पर्श केला.  file photo
अर्थभान

Stock Market Updates | शेअर बाजारात विक्रमी तेजीचा चौकार! सेन्सेक्स ७९ हजारांवर

Nifty Bank ही नव्या शिखरावर, तेजीचे कारण काय?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतीय शेअर बाजाराने गुरुवारी (दि. २७) विक्रमी तेजीचा चौकार मारला. सलग चौथ्या दिवशी सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा उच्चांक नोंदवला. शेअर बाजाराची सुरुवात सुस्त झाली होती. पण काही वेळातच बाजाराने वेग पकडला आणि सेन्सेक्सने ३०० हून अंकांनी वाढून ७९ हजारांच्या अंकाला स्पर्श केला. तर निफ्टी पहिल्यांदाच २३, ९५० पार झाला.

कोणते शेअर्स टॉप गेनर्स?

सेन्सेक्स आज ७८,७५८ वर खुला झाला. त्यानंतर त्याने ७९,०३३ च्या विक्रमी उच्चांकाला स्र्पर्श केला. सेन्सेक्सवर अल्ट्राटेक सिमेंटचा शेअर्स टॉप गेनर राहिला. हा शेअर्स ४ टक्क्यांनी वाढून ११,६१५ रुपयांवर व्यवहार करत आहे. तसेच जेएसडब्ल्यू स्टील, रिलायन्स, कोटक बँक हे शेअर्सही सर्वाधिक तेजीत आहेत. तर टेक महिंद्रा, मारुती, एचसीएल टेक, सन फार्मा, एलटी या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

निफ्टी २४ हजारांजवळ

निफ्टी ५० निर्देशांक आज २३,८८१ वर खुला झाला होता. त्यानंतर तो २४ हजारांजवळ पोहोचला. निफ्टीवर अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासीम, डॉ. रेड्डीज, जेएसडब्ल्यू स्टील हे शेअर्स वाढून व्यवहार करत आहेत. तर टेक महिंद्रा, एचसीएल टेक, मारुती, कोल इंडिया हे शेअर्स घसरले आहेत.

निफ्टी बँकचा नवा उच्चांक

दरम्यान, निफ्टी बँकने आज ५३,१८० चा नवा उच्चांक नोंदवला. निफ्टी बँकवर ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, फेडरल बँक हे शेअर्स तेजीत आहेत. तर पीएनबी, AU Small Finance Bank आणि बंधन बँक या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.

बाजारातील तेजीचे कारण काय?

परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय शेअर बाजारात वाढलेला गुंतवणुकीचा ओघ, मजबूत देशांतर्गत आर्शिक स्थिती हे घटक बाजारात तेजीमागे असल्याचे बाजारातील विश्लेषकांचे म्हणणे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT