निफ्टीने आज २५,४४५ च्या अंकाला स्पर्श करत नवा विक्रमी उच्चांक नोंदवला. file photo
अर्थभान

Stock Market Updates | 'निफ्टी'चा नवा विक्रमी उच्चांक! 'सेन्सेक्स'ही तेजीत खुला

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

अमेरिकेची फेडरल रिझर्व्ह या आठवड्यात व्याजदरात कपात करेल, या अपेक्षेने भारतीय शेअर बाजाराने (Stock Market Updates) सोमवारी (दि.१६) तेजीत सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) २५० अंकांनी वाढून ८३,१४० पार झाला. तर निफ्टीने (Nifty) २५,४४५ च्या अंकाला स्पर्श करत नवा विक्रमी उच्चांक नोंदवला. मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून येत आहे. बँकिंग शेअर्सही वाढून व्यवहार करत आहेत.

क्षेत्रीय पातळीवर निफ्टी मेटल ०.७ टक्क्यांनी वाढला आहे. पीएययू बँकमध्येही खरेदीचा जोर दिसून येत आहे. पण एफएमसीजीमध्ये घसरण झाली आहे.

कोणते शेअर्स तेजीत?

निफ्टीवर अदानी एंटरप्रायजेस, एनटीपीसी, कोटक बँक, ॲक्सिस बँक, एलटी हे टॉप गेनर्स शेअर्स आहेत. तर हिंदुस्तान युनिलिव्हर, ब्रिटानिया, एसबीआय लाईफ, हिरो मोटोकॉर्प हे शेअर्स घसरले आहेत.

निफ्टीने आज २५,४०० चा टप्पा पार केला.

सेन्सेक्सवर एनटीपीसी, एलटी, ॲक्सिस बँक, कोटक बँक, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल हे शेअर्स हिरव्या रंगात खुले झाले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT