शेअर बाजाराला गणपती बाप्पा पावला!

गुरुवारी भारतातील महागाईचा आकडा जाहीर
Nifty and Sensex point to record breaking gains
शेअर बाजाराला गणपती बाप्पा पावला!Pudhari File Photo
Published on
Updated on

भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

बुधवारी रात्री अमेरिकेतील महागाईचे आकडे आले. गुरुवारी भारतातील महागाईचा आकडा जाहीर झाला. दोन्हीही अपेक्षेप्रमाणे खाली आले. भारतातील महागाईचा आकडा मागील तिमाहीपेक्षा थोडा जास्त असला तरी आरबीआयने 2025 सालासाठी ठेवलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी तो सुसंगतच होता. याचा परिणाम आपण पाहिलाच. निफ्टीमध्ये 470 आणि सेन्सेक्समध्ये 1439 पॉईटंस्ची रेकॉर्ड ब्रेक तेजी! गेले कित्येक दिवस निफ्टी 24800 - 25150 या रेंजमध्ये अडकलेला होता. बँक निफ्टी ही 51500 चा अडथळा पार करत नव्हता. गुरुवारी हे सर्व अडथळे उद्ध्वस्त झाले.

बँकिंग आणि फायनान्स हा कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा आणि पर्यायाने शेअर बाजाराचाही प्रमुख हिस्सेदार असतो. HDFC Bank SBI, ICICI Bank, Kotak Mahindra Bank या चार प्रमुख बँकांनी ज्या इंडेक्सच्याही Heavy Weights आहेत. गुरुवारच्या तेजीला चांगलाच हातभार लावला. Bharti Airtel हा टेलिकम्युनिकेशन्स सेक्टरमधील एकमेव Listed शेअर आहे. भारतातील या सेक्टरमधील Bharti Airtel आणि Jio यांचे धु्रवीकरण पाहता, Bharti Aitel मध्ये Accumulation गुंतवणूकदारांना अंतिमतः चांगलाच लाभ मिळवून देईल. अर्थात, गुंतवणूकदारांनी स्वतः अभ्यास करावा. शुक्रवारचा शेअरचा बंद भाव आहे रु. 1632.20.

FIIS, FPIS यांचे बाजारातील भरीव योगदान हा येणार्‍या तेजीवर शिक्कामोर्तब करणारा घटक असतो. गत सप्ताहातील पाचही दिवस FPIS नी भारतीय बाजारांमध्ये ‘जमके’ खरेदी केली. रु. 15200 कोटींची निव्वळ खरेदी! जोडीला म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा प्रचंड ओघ! 17 व 18 सप्टेंबर रोजी फेडरल रिझर्व्हची मीटिंग आहे. व्याज दर कमी होणार ही आता काळ्या दगडावरची रेघ आहे. अमेरिकेत हा सोपस्कार पार पडला की, भारतात रिझर्व्ह बँकही दर कमी करेल. बाजारातील तेजीचा मार्ग मग अधिकच प्रशस्त होत जाईल आणि सर्वांच्या नजरा लागतील त्या सेन्सेक्स - 1,00,000 या ध्येयाकडे! तो दिवस फार दूर नाही, अशी आपण आशा करू या.

अमेरिकेत मंदी कमी होत जाईल तसे भारतात IT शेअर्स तेजी पकडतील. गेले तीन महिने IT इंडेक्स तेजी दाखवतोच आहे. तीन महिन्यात 25 टक्के रिटर्नस् या निर्देशांकांने दाखवले आहेत. ही तेजी इथून पुढे आणखी घट्ट होत जाईल. Infosys, HCL Tech, LTI Mindtree, Persistent Systems, Mphasis, Coforge या शेअर्सनी तीन महिन्यांत 27 ते 41 टक्के रिटर्नस् दिले आहेत. क्रुड ऑईलचे दर घसरल्यामुळे केमिकल कंपन्यांचे शेअर्स चांगलेच वधारले आहेत. Gujarat Fluorochem, Godrej Industries, Himadri Speciality Chemicals, PCBL, SH Kelkar, Indo Amines या शेअर्सनी मागील एक महिन्यात 25 टक्क्यांहून अधिक रिटर्नस् दिले आहेत; परंतु गुंतवणूकदारांनी Industry PE आणि Stock PE यांचा तुलनात्मक सखोल अभ्यास करावा आणि मगच गुंतवणुकीसाठी शेअर्स निवडावेत.

New Age Tech Companies हा एक नवीन अवकाश आधुनिक युगात गुंतवणुकीसाठी उपलब्ध झाला आहे. Radical business Conepts आणि तो Business चालवण्यासाठी Artificial Intelligence सारख्या विलक्षण तंत्रज्ञानाचा वापर ही दोन महत्त्वाची आयुधे या कंपन्यांची आहेत. ऑगस्ट महिन्यात म्युच्युअल फंडसनी ज्या पाच शेअर्समध्ये प्रामुख्याने गुंतवणूक केली, त्यामध्ये Ola Electric, First Cry, Zomato या तीन कंपन्यांचा समावेश होता.

म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूकदार रेकॉर्ड ब्रेक गुंतवणूक करीत आहेत. अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपन्यांचे शेअर्स त्यामुळे प्रकाशझोतात आहेत आणि येणारा काळही तीच परिस्थिती दाखवेल. हीच गाथा ब्रोकिंग कंपन्यांच्या शेअर्सचीही असेल. दरमहा उच्चांक गाठणारा डिमॅट अकाऊंटस्चा आकडा ब्रोकिंग कंपन्यांच्या तेजीला कारणीभूत आहे. त्याद़ृष्टीने खालील काही कंपन्यांचा गुंतवणूकदारांनी नीट अभ्यास करावा.

Angle one - CMP Rs. 2454

Prudent Corporate - CMP Rs. 2390

UTI AMC - CMP Rs. 1287

CDSL - CMP Rs. 1381.75

यापैकी CDSL या डिपॉझिटरीच भारतीय शेअर बाजारातील स्थान आणि Monoploy पाहता, हा शेअर येत्या काही वर्षांत गगनाला भिडला तर आश्चर्य वाटू नये. भारतातील Insurance Giant आणि क्रमांक एकची DII, असणार्‍या LTC ने IRCTC मधील गुंतवणूक वाढवली आहे. Monopoly in Key Services, Growth Oriented Business model, Strong Financial, Performance आणि Digital Transformation and Innovation ही चार कारणे LIC ने सांगितली आहेत.

Fibonacci Level प्रमाणे 1.382% टक्क्यांनुसार निफ्टीचा टप्पा आहे. 25360 जो गुरुवारीच निफ्टीने पार केला आहे. आता पुढील दीड टक्क्यांचा टप्पा आहे 25.800 सप्टेंबर महिन्यात तोही पार होईल काय?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news