सेन्सेक्स आज २८५ अंकांनी वाढून ८१,७४१ वर बंद झाला. file photo
अर्थभान

Stock Market Today | शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर बंद, गुंतवणूकदारांनी कमावले १.६१ लाख कोटी

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतीय शेअर बाजारातील (Stock Market Today) निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी सलग चौथ्या सत्रात वाढून बंद झाले. सेन्सेक्स (Sensex) २८५ अंकांनी वाढून ८१,७४१ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) ९३ अंकांच्या किरकोळ वाढीसह २४,९५१ वर स्थिरावला. आजच्या ट्रेडिंग सत्रात १,८२८ शेअर्स वधारले. तर १,६१३ शेअर्स घसरले. दरम्यान, ७८ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आली नाही.

Stock Market Today : ठळक मुद्दे

  • भारतीय शेअर बाजार नव्या उच्चांकावर बंद.

  • सेन्सेक्स २८५ अंकांनी वाढून ८१,७४१ वर बंद.

  • निफ्टी ९३ अंकांच्या किरकोळ वाढीसह २४,९५१ वर स्थिरावला.

  • आजच्या ट्रेडिंग सत्रात १,८२८ शेअर्स वधारले.

  • रियल्टी, पीएसयू बँक वगळता इतर सर्व निर्देशांक हिरव्या रंगात बंद.

  • बीएसई मिडकॅप (BSE MidCap) ०.८ टक्क्यांनी वाढला.

  • आयटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी.

क्षेत्रीय निर्देशांकात रियल्टी, पीएसयू बँक वगळता इतर सर्व हिरव्या रंगात बंद झाले. मीडिया, पॉवर, हेल्थकेअर, मेटल आणि फार्मा प्रत्येकी १ टक्क्याने वाढले. बीएसई मिडकॅप (BSE MidCap) ०.८ टक्क्यांनी वाढला. तर स्मॉलकॅप सपाट पातळीवर बंद झाला.

आयटी शेअर्स वधारले, कारण काय?

आज रात्री उशिरा जाहीर होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या ‍व्याजदराबाबतच्या पतधोरण निर्णयापूर्वी भारतीय शेअर बाजारातील आयटी शेअर्स वधारले. यामुळे भारतीय बेंचमार्क इक्विटी निर्देशांक बुधवारी विक्रमी उच्चांकावर बंद झाले. मारुती सुझुकी, भारती एअरटेल आणि आयटीसी यांच्या तेजीचा बाजाराला सपोर्ट मिळाला.

BSE Market Cap : गुंतवणूकदारांना १.६१ लाख कोटींचा फायदा

बाजारातील आजच्या तेजीमुळे बीएसईवरील सर्व सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल १.६१ लाख कोटींनी वाढून ४६२.५२ लाख कोटींवर पोहोचले.

सेन्सेक्सवर कोणते शेअर्स वधारले?

सेन्सेक्सवर जेएसडब्ल्यू स्टील, एशियन पेंट्स, मारुती, एनटीपीसी, अदानी पोर्ट्स, भारती एअरटेल, आयटीसी हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर रिलायन्स, टाटा मोटर्स, इन्फोसिस, एम अँड एम हे शेअर्स घसरले.

सेन्सेक्सवर आज जेएसडब्ल्यू स्टीलचा शेअर टॉप गेनर ठरला.

निफ्टीवर मारुती, जेएसडब्ल्यू स्टील, एचडीएफसी लाईफ, एशियन पेंट्स, एनटीपीसी हे शेअर्स २ ते ४ टक्क्यांदरम्यान वाढले. तर ब्रिटानिया, डॉ. रेड्डीज, अपोलो हॉस्पिटल, टाटा कन्झ्यूमर या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

निफ्टी ५० चा आजचा ट्रेडिंग आलेख.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT