Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; सेंसेक्स 359 अंकांनी वाढला, निफ्टीही तेजीत

Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराने डिसेंबरची दमदार सुरुवात केली असून सेंसेक्सने तब्बल 359 अंकांची झेप घेतली. ग्लोबल मार्केटमधील सकारात्मक संकेत, DII ची मोठी खरेदी आणि मजबूत तिमाही निकालांमुळे बाजारात तेजीचे वातावरण दिसले.

Rahul Shelke

Stock Market Today: डिसेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजाराने दमदार सुरुवात करत गुंतवणूकदारांचा उत्साह वाढवला. सोमवारी बाजार उघडताच सेंसेक्सने तब्बल 359 अंकांची झेप घेत 86,065.92 वर सुरुवात केली. तर निफ्टी 50 नेही 122.85 अंकांची वाढ घेत 26,325.80 चा टप्पा गाठला. बँकिंग शेअर्समध्येही तेजी दिसून आली आणि निफ्टी बँक 214 अंकांनी वाढून 59,966.85 वर पोहोचला.

ग्लोबल मार्केटमधून सकारात्मक संकेत

गिफ्ट निफ्टीही 128 अंकांनी वाढत 26,515 वर व्यवहार करत होता, ज्यामुळे भारतीय बाजार मोठ्या वाढीसह उघडण्याचे स्पष्ट संकेत मिळाले. अमेरिकन बाजारांमध्ये शुक्रवारी खरेदी झाली.

  • डाऊ जोंस 289 अंकांनी वाढला

  • नॅस्डॅक 151 अंकांनी वाढला

आशियाई बाजारातही हँगसेंगमध्ये 244 अंकांची वाढ झाली. या सर्व सकारात्मक जागतिक संकेतांमुळे बाजाराचे वातावरण तेजीत होते.

FII ची विक्री सुरू; DIIचा मजबूत आधार

28 नोव्हेंबरच्या आकडेवारीनुसार—

  • FII ने तब्बल 3,672.27 कोटींची विक्री केली

  • तर DII ने उलट दिशेने 3,993.71 कोटींची मोठी खरेदी केली

घसरणीच्या काळातही भारतीय गुंतवणूकदारांचा विश्वास मजबूत असल्याचे हे आकडे दाखवतात.

आजचे टॉप गेनर्स

  • TMPV

  • BEL

  • TATA STEEL

  • ADANI PORTS

  • SBI

आजचे टॉप लूजर्स

  • TITAN

  • MARUTI

  • BAJFINANCE

  • ITC

आज कोणत्या शेअर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष?

लेंसकार्ट सॉल्यूशन्स

कंपनीने दुसऱ्या तिमाहीत जबरदस्त कामगिरी केली आहे.

  • नफा 20% वाढत 102 कोटींवर

  • महसूल आणि मार्जिन दोन्ही चांगले आहे

NCC लिमिटेड

कंपनीला 2,500 कोटी रुपयांहून अधिकचे मोठे कंत्राट मिळाले आहे. एका ऑर्डरची किंमतच 2,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आज या शेअरमध्ये हालचाल दिसू शकते.

कच्चे तेल, डॉलर-रुपया आणि सोन्याचा अंदाज

  • ब्रेंट क्रूड 63.14 डॉलर/बॅरल — भारतासाठी मोठी दिलासा

  • सोने 4,227.85 डॉलर — तेजी कायम

  • रुपया 89.33 प्रति डॉलर

आजच्या सत्रात ग्लोबल ट्रेंड आणि देशांतर्गत आकडेवारीमुळे बाजारात तेजी दिसून येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT