Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: RBIच्या निर्णयाआधी शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स 120 अंकांनी खाली, निफ्टीही लाल रंगात

Stock Market Today: Reserve Bank of India च्या MPC निर्णयाआधी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली असून सेन्सेक्स 120 अंकांनी घसरला. निफ्टीही लाल रंगात होता, मात्र प्रायव्हेट बँक आणि रिअल्टी शेअर्समध्ये खरेदी झाली.

Rahul Shelke

Stock Market Today: आज जाहीर होणाऱ्या Reserve Bank of India (RBI) च्या पतधोरणाच्या निर्णयाआधी देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सकाळी व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स सुमारे 120 अंकांनी घसरला, तर निफ्टीही जवळपास 50 अंक खाली आला. पुढे बाजारात मोठी चढ-उतार (व्होलॅटिलिटी) पाहायला मिळाली.

सकाळी 9.30 च्या सुमारास सेन्सेक्स सुमारे 135 अंकांनी घसरून 83,178 च्या आसपास व्यवहार करत होता. निफ्टी 25,582 च्या पातळीवर होता. मात्र बँक निफ्टीमध्ये थोडी तेजी दिसून आली आणि तो 40 अंकांनी वाढून 60,104 च्या आसपास पोहोचला. प्रायव्हेट बँक आणि रिअल्टी शेअर्समध्ये खरेदी झाली, पण उर्वरित बहुतांश सेक्टरमध्ये दबाव कायम राहिला.

जागतिक बाजारातील घसरण, क्रिप्टो आणि कमोडिटी मार्केटमधील विक्री, तसेच कमकुवत GIFT निफ्टी, या सगळ्यांचा परिणाम भारतीय बाजारावर होताना दिसत आहे. याशिवाय आज RBI कडून येणारा व्याजदरावरील निर्णय हा बाजारासाठी सर्वात मोठा ट्रिगर मानला जात आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष कंपन्यांचे निकाल आणि FII–DII गुंतवणुकीवरही आहे.

दरम्यान, GIFT निफ्टी सकाळी सुमारे 135 अंकांनी घसरून 25,600 च्या आसपास व्यवहार करत होता. अमेरिकन फ्युचर्सही दबावात असल्याने देशांतर्गत बाजारावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RBI चा निर्णय केंद्रस्थानी

आज RBI पतधोरण जाहीर करणार आहे. बाजारातील तज्ज्ञांच्या अंदाजानुसार यावेळी व्याजदरात बदल होण्याची शक्यता कमी आहे. मात्र महागाई आणि आर्थिक वाढीबाबत RBI काय संकेत देते, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

अमेरिकन बाजारात मोठी विक्री

टेक शेअर्समधील जोरदार विक्रीमुळे अमेरिकन बाजारात मोठी घसरण झाली. डाओ जोन्स सुमारे 600 अंकांनी कोसळला, तर नॅस्डॅकमध्येही 300 हून अधिक अंकांची घसरण झाली. जागतिक पातळीवरील ‘रिस्क-ऑफ’ वातावरणाचा परिणाम आज भारतीय बाजारावरही दिसू शकतो.

सोने–चांदी आणि कमोडिटीत मोठी घसरण

कमोडिटी बाजारातही जोरदार विक्री झाली आहे. देशांतर्गत बाजारात चांदी सुमारे 25 हजार रुपयांनी घसरून 2.44 लाखांच्या खाली आली, तर सोन्याच्या दरात सुमारे 1 हजार रुपयांची घट होऊन भाव 1.52 लाखांच्या आसपास पोहोचले. जागतिक बाजारात चांदी जवळपास 20 टक्क्यांनी कोसळली असून सोन्यातही सुमारे 200 डॉलरची घसरण झाली आहे.

कच्च्या तेलात घसरण

अमेरिका–ईरान चर्चेच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमती सुमारे 3 टक्क्यांनी घसरून 67 डॉलरच्या आसपास आल्या आहेत. यामुळे ऊर्जा क्षेत्रातील शेअर्समध्ये हालचाल दिसू शकते, तसेच महागाईबाबत बाजाराला थोडा दिलासाही मिळू शकतो.

थोडक्यात सांगायचं तर, RBI च्या निर्णयाआधी जागतिक संकेत आणि कमोडिटी मार्केटमधील घसरणीमुळे भारतीय शेअर बाजारावर दबाव आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT