Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स 350 अंकांनी खाली, कोणते शेअर्स वाढले?

Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली असून सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही दबावाखाली दिसले. आयटी शेअर्समध्ये मोठी विक्री झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Stock Market Today: आज शेअर बाजाराची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. आठवड्याच्या एक्सपायरी दिवशी सेन्सेक्स सुरुवातीलाच सुमारे 350 अंकांनी घसरला, तर निफ्टी 23,800 च्या खाली घसरत 75 अंकांनी खाली आला. बँक निफ्टीतही दबाव दिसून आला. आयटी शेअर्समध्ये मोठी विक्री झाली, तर मेटल आणि ऑईल-गॅस क्षेत्रातील शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली.

सकाळी सुमारे 9.23 वाजता सेन्सेक्स 430 अंकांनी घसरून 75,581 वर ट्रेड करत होता. निफ्टी 119 अंकांनी खाली येत 23,698 च्या आसपास होता. बँक निफ्टीही 258 अंकांनी घसरून 54,185 च्या पातळीवर पोहोचला होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्येही 0.6 ते 0.9 टक्क्यांपर्यंत घसरण दिसली.

आजच्या व्यवहारात Infosys, Tech Mahindra, TCS, HCLTech आणि Wipro यांसारख्या आयटी कंपन्यांचे शेअर्स घसरले. दुसरीकडे ONGC चे शेअर्स 3 टक्क्यांहून अधिक वाढले. तसेच Tata Steel, Coal India, Reliance Industries आणि Sun Pharma यांमध्येही तेजी दिसली.

जागतिक बाजारातील कमकुवत संकेतांमुळे भारतीय बाजारावर दबाव वाढला आहे. पश्चिम आशियातील तणाव अजूनही कायम असून कच्च्या तेलाच्या किंमती 105 डॉलर प्रति बॅरलच्या आसपास आहेत. याशिवाय परदेशी गुंतवणूकदारांकडून (FIIs) मोठ्या प्रमाणावर विक्री सुरू असल्याने बाजारातील भीती वाढली आहे.

दरम्यान, नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा नागरिकांना अनावश्यक सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. तसेच पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करावा आणि शक्य असल्यास वर्क फ्रॉम होमचा अवलंब करावा असेही त्यांनी म्हटले. या विधानाचा परिणाम ज्वेलरी, एव्हिएशन, FMCG आणि EV क्षेत्रातील शेअर्सवर होण्याची शक्यता आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्य पूर्वेतील परिस्थितीबाबत पुन्हा इशारा दिल्याने अमेरिका-इराण तणाव वाढला आहे. त्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

कमोडिटी बाजारात सुरक्षित गुंतवणुकीच्या मागणीमुळे सोने आणि चांदीच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली. चांदी तब्बल ₹16,400 ने वाढून ₹2.78 लाख प्रति किलोच्या वर गेली, तर सोने ₹1,100 ने वाढून ₹1.53 लाख प्रति 10 ग्रॅमच्या आसपास बंद झाले.

परदेशी गुंतवणूकदारांनी सलग पाचव्या दिवशी विक्री केली. FIIs ने सुमारे ₹8,400 कोटींची विक्री केली, तर DIIs ने सलग बाराव्या दिवशी खरेदी करत बाजाराला आधार दिला.

आज बाजाराचे लक्ष महागाईचे आकडे, कच्च्या तेलाच्या किंमती, जागतिक बाजारातील हालचाली आणि मोठ्या कंपन्यांच्या निकालांकडे लागलेले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT