Stock Market Today: भारतीय शेअर बाजाराने नव्या आठवड्याची सुरुवात सकारात्मक केली आहे. सोमवारी सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स 177 अंकांच्या वाढीसह 77,940 वर, तर निफ्टी 36 अंकांच्या वाढीसह 24,306 वर उघडला. सुरुवातीच्या काही मिनिटांतच निफ्टीने 24,350 चा टप्पा ओलांडत गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
जुलै महिन्यातील आतापर्यंतच्या तीन व्यवहारांमध्ये निफ्टीने तब्बल 405 अंकांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यातही निफ्टी सुमारे 0.9 टक्क्यांच्या वाढीसह 24,270 वर बंद झाला होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांनीही मजबूत कामगिरी करत अनुक्रमे 0.9 टक्के आणि 1.2 टक्क्यांची वाढ केली.
आजच्या सुरुवातीच्या व्यवहारात ऑटो, वित्तीय सेवा (Financial Services), मेटल आणि फार्मा क्षेत्रातील शेअर्समध्ये चांगली खरेदी दिसून आली. दुसरीकडे आयटी, मीडिया आणि पीएसयू बँक क्षेत्रातील शेअर्सवर काहीसा दबाव दिसत आहे.
निफ्टी-50 मधील आघाडीच्या वाढणाऱ्या शेअर्समध्ये HDFC Bank, भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL), Axis Bank, Hindalco आणि Bajaj Auto यांचा समावेश आहे.
तर Kotak Mahindra Bank, Bajaj Finserv, Power Grid, TCS आणि ITC या शेअर्समध्ये सुरुवातीच्या व्यवहारात घसरण दिसून आली.
आजच्या व्यवहारावर काही महत्त्वाच्या घटकांचा प्रभाव दिसून येत आहे.
GIFT Nifty सुरुवातीला घसरणीत असला तरी देशांतर्गत बाजाराने सकारात्मक सुरुवात केली.
आशियाई बाजारात जपानचा निक्केई आणि दक्षिण कोरियाचा कोस्पी निर्देशांक घसरले.
कच्च्या तेलाचा भाव 72 डॉलरच्या आसपास स्थिर असल्याने आयातदार कंपन्यांना काहीसा दिलासा मिळाला.
परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) मागील सत्रात 1,353 कोटी रुपयांची खरेदी केली, तर देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (DII) 1,954 कोटी रुपयांची विक्री केली.
तांत्रिक विश्लेषणानुसार निफ्टीने 24,200 चा महत्त्वाचा प्रतिकार स्तर पार केला आहे.
सेक्टोरल निर्देशांकांमध्ये रिअल्टी क्षेत्रात सर्वाधिक 7.8 टक्क्यांची वाढ झाली. त्याशिवाय हेल्थकेअर, कन्झ्युमर ड्युरेबल्स, एफएमसीजी आणि मेटल क्षेत्रांनीही चांगली कामगिरी केली. मात्र कॅपिटल गुड्स, पॉवर आणि ऑइल अँड गॅस क्षेत्रातील निर्देशांकांमध्ये घसरण झाली.
गेल्या आठवड्यात Eternal या शेअरमध्ये सर्वाधिक 10.4 टक्क्यांची वाढ झाली. याशिवाय Bajaj Finserv, Adani Enterprises, Bajaj Finance आणि Maruti Suzuki या शेअर्सनीही गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला.
दुसरीकडे Larsen & Toubro (L&T) मध्ये 4.5 टक्क्यांची घसरण झाली. तसेच Eicher Motors, HDFC Life, Kotak Mahindra Bank आणि Tata Motors PV या शेअर्समध्येही विक्रीचा दबाव दिसून आला.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे तांत्रिक विश्लेषक नागराज शेट्टी यांच्या मते, निफ्टीने 24,200 चा महत्त्वाचा प्रतिकार स्तर ओलांडला असला तरी अजून मजबूत तेजीचे संकेत मिळालेले नाहीत. त्यांच्या मते,
24,050 हा निफ्टीसाठी तातडीचा सपोर्ट लेव्हल आहे.
तर 24,600 हा पुढील रेझिस्टन्स लेव्हल मानला जात आहे.
सध्या बाजाराचा कल सकारात्मक असला तरी पुढील काही सत्रांमध्ये जागतिक घडामोडी, परदेशी गुंतवणूकदारांचा ओघ आणि कंपन्यांच्या तिमाही निकालांवर बाजाराची दिशा अवलंबून राहणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.