Stock Market Opening Updates
सोमवारच्या घसरणीनंतर मंगळवारी (दि.१ जुलै) भारतीय शेअर बाजार सावरला. सुरुवातीला सेन्सेक्स २०० अंकांनी वाढून ८३,८०० वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक ६१ अंकांच्या वाढीसह २५,५७० वर व्यवहार करत आहे.
आशियाई बाजारातील तेजीचा मागोवा घेत भारतीय शेअर बाजारानेही आज तेजीत सुरुवात केली. सेन्सेक्स भारत इलेक्ट्रॉनिक्स, एशियन पेंट्स, एम अँड एम, रिलायन्स, भारती एअरटेल, टाटा मोटर्स, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स वाढले आहेत. तर दुसरीकडे ॲक्सिस बँक, ट्रेंट, सन फार्मा, टाटा स्टील, इर्टनल, एसबीआय हे शेअर्स घसरले आहेत.
क्षेत्रीयमधील निफ्टी रियल्टी निर्देशांक ०.३ टक्के वाढला आहे. निफ्टी बँक, ऑईल अँड गॅस, ऑटो, एफएमसीजी आणि आयटी निर्देशांकही किरकोळ वाढीसह खुले झाले आहेत. एनएसईवरील बहुतांश क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत.
सोमवारी सेन्सेक्स ४५२ अंकांच्या घसरणीसह ८३,६०६ वर बंद झाला होता. तर निफ्टी ५० निर्देशांक १२० अंकांनी घसरून २५,५१७ वर स्थिरावला होता. काल बाजारात काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंग दिसून आले होते. पण बाजार एक दिवसाच्या घसरणीतून सावरला आहे.