Stock Market Opening Updates
भारतीय शेअर बाजारात सोमवारी (दि. ३० जून) चढ-उतार दिसून आला. सकाळच्या सुरुवातीला व्यवहारात सेन्सेक्स २०० अंकांनी घसरून ८३,८५० च्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक ५० अंकांच्या घसरणीसह २५,६०० च्या खाली व्यवहार करत आहे. फायनान्सियल आणि ऑटो शेअर्सवर दबाव दिसून येत आहे.
सेन्सेक्सवर कोटक बँक, एनटीपीसी, पॉवर ग्रिड, भारती एअरटेल, इन्फोसिस, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, मारुती हे शेअर्स ०.५ ते १ टक्के घसरले आहेत. तर एसबीआय, इर्टनल, एलटी, सन फार्मा, हिंदुस्तान युनिलिव्हर, टाटा स्टील हे शेअर्स वाढले आहेत.
क्षेत्रीय आघाडीवर निफ्टी ऑटो, फायनान्सियल सर्व्हिसेस निर्देशांक घसरले आहेत. तर निफ्टी पीएसयू बँक (Nifty PSU Bank) निर्देशांक १.५ टक्के वाढला आहे. निफ्टी मीडिया, फार्मा, ऑईल अँड गॅस, हेल्थकेअर आणि कन्झ्यूमर ड्युराबेल हेही तेजीत खुले झाले आहेत. दरम्यान, सलग सातव्या सत्रात स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये तेजी दिसून आली आहे.
मध्य पूर्वेतील तणाव कमी झाला आहे. तसेच विदेशी गुंतवणुकीतही वाढ झाली आहे. तरीही बाजारात दबाव दिसून आला आहे.