Stock Market Opening Bell
भारतीय शेअर बाजारात गुरुवारी (दि.१२) चढ- उतार दिसून आला. सकाळच्या सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स १२५ अंकांनी वाढून ८२,६३० वर पोहोचला. तर निफ्टी ५० निर्देशांक ४० अंकांच्या किरकोळ वाढीसह २५,१८० वर गेला. त्यानंतर लगेच दोन्ही निर्देशांक लाल रंगात व्यवहार करताना दिसून आले. सकाळी १० च्या सुमारास सेन्सेक्स २०० हून अधिक अंकांनी घसरून ८२,३०० च्या खाली आला. तर निफ्टी ५० निर्देशांक ७० अंकांनी घसरून २५ हजारांवर व्यवहार करत होता.
विशेषतः फार्मा शेअर्समध्ये जोरदार खरेदी होत आहे. निफ्टी फार्मा निर्देशांक १.२ टक्के वाढला आहे.
सेन्सेक्सवर सन फार्मा, एशियन पेंट्स हे शेअर्स २ टक्के वाढले आहेत. त्याचबरोबर बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल, एनटीपीसी, बजाज फायनान्स, अदानी पोर्ट्स, एचडीएफसी बँक हे शेअर्सही वधारले आहेत. तर इन्फोसिस, इर्टनल, टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, एचसीएल टेक, टाटा स्टील हे शेअर्स घसरले आहेत.
आयटी शेअर्सवर दबाव दिसून येत आहे. निफ्टी आयटी निर्देशांक १.३ टक्के घसरला आहे. गेल्या सहा सत्रांत आयटी शेअर्स तेजीत राहिले होते. पण आज या तेजीला ब्रेक लागला.
पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्सचा शेअर्स ७ टक्के घसरला.