Stock Market Closing updates  (Pudhari Photo)
अर्थभान

Stock Market Closing | सपाट सुरुवातीनंतर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ६७७ अंकांनी वाढून बंद

जाणून बाजारातील तेजीत कोणते शेअर्स राहिले आघाडीवर?

दीपक दि. भांदिगरे

Stock Market Closing Updates

इस्रायल- इराण यांच्यातील वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर चिंता असूनही, भारतीय शेअर बाजाराने सोमवारी सलग दोन सत्रांतील घसरणीनंतर तेजी नोंदवली. सेन्सेक्स ६७७ अंकांनी वाढून ८१,७९६ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक २२७ अंकांनी वाढून २४,९४६ वर स्थिरावला. शेअर बाजाराची आज सपाट सुरुवात झाली होती. त्यानंतर त्यात जोरदार तेजी दिसून आली.

बाजाराला आज आयटी आणि फायनान्सियल शेअर्समधील तेजीचा आधार मिळाला. तसेच कच्च्या तेलाच्या किमतीत घट झाल्यामुळेही गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या. सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. निफ्टी आयटी निर्देशांक १.५ टक्के आणि निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस ०.८ टक्के वाढला. निफ्टी ऑईल अँड गॅस १.१ टक्के वाढला.

दुसरीकडे बीएसई मिडकॅप ०.९ टक्के आणि स्मॉलकॅप ०.३ टक्के वाढून बंद झाला.

कोणते शेअर्स वधारले?

सेन्सेक्सवर अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा हे शेअर्स प्रत्येकी २ टक्के वाढले. त्याचबरोबर एचसीएल टेक, टीसीएस, इन्फोसिस, एशियन पेंट्स, टाटा स्टील, कोटक बँक, इर्टनल, एलटी, आयटीसी, मारुती, भारती एअरटेल, पॉवर ग्रिड हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. तर टाटा मोटर्सचा शेअर्स ३.५ टक्के घसरला. अदानी पोर्टस्, सन फार्मा हे शेअर्सही लाल रंगात बंद झाले.

निफ्टी ५० वर भारत इलेक्ट्रॉनिक्स, एचडीएफसी लाईफ, एसबीआय लाईफ हे शेअर्स २ ते २.५ टक्क्यांपर्यंत वाढले. तर टाटा मोटर्स, डॉ. रेड्डीज, सन फार्मा हे शेअर्स घसरले.

बाजारातील तेजीमागील घटक

डॉलर निर्देशांकात घसरण झाली आहे. तसेच इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे गेल्या शुक्रवारी कच्च्या तेलाचे दर ७ टक्क्यांहून अधिक वाढले होते. दरम्यान, सोमवारी कच्च्या तेलाच्या दरात किचिंत घसरण झाली. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल ७३.५० डॉलरपर्यंत खाली आला. हे घटक भारतीय शेअर बाजारासाठी फायद्याचे ठरले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT