सेन्सेक्स आज ८७४ अंकांनी वाढून ७९,४६८ वर बंद झाला. file photo
अर्थभान

चौफेर खरेदी! सेन्सेक्स ८७४ अंकांनी वाढून बंद, गुंतवणूकदारांची ९.१८ लाख कोटींची कमाई

Stock Market Closing Bell | RBI च्या निर्णयापूर्वी बाजारात तेजीचा माहौल

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) उद्या ८ ऑगस्ट रोजी पतधोरण जाहीर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी बुधवारी (दि.७) वधारुन बंद झाले. गेल्या दिवसांत बाजारात घसरण झाली होती. पण आज या घसरणीला ब्रेक लागला. सेन्सेक्स (Sensex) ८७४ अंकांनी वाढून ७९,४६८ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) ३०४ अंकांच्या वाढीसह २४,२९७ वर स्थिरावला. (Stock Market Closing Bell)

ठळक मुद्दे

  • गेल्या तीन दिवसांतील घसरणीला ब्रेक.

  • सेन्सेक्स ८७४ अंकांनी वाढून ७९,४६८ वर बंद.

  • निफ्टी ३०४ अंकांच्या वाढीसह २४,२९७ वर स्थिरावला.

  • बीएसईवर आज ४,०३१ शेअर्समध्ये व्यवहार दिसून आला.

  • २,९८८ शेअर्स तेजीसह बंद, ९४५ शेअर्समध्ये घसरण.

  • बाजारातील तेजीत बँकिंग, मेटल, आयटी शेअर्स आघाडीवर राहिले.

  • बीएसई मिडकॅप २.६ टक्क्याने, स्मॉलकॅप २.३ टक्क्याने वाढून बंद.

क्षेत्रीय निर्देशांकात मेटल, हेल्थकेअर, मीडिया, पॉवर, टेलिकॉम, ऑईल आणि गॅस, कॅपिटल गुड्स २ ते ३ टक्क्यांनी वाढले. आज सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. बीएसई मिडकॅप २.६ टक्क्याने आणि स्मॉलकॅप निर्देशांक २.३ टक्क्याने वाढला.

गुंतवणूकदारांची ९.१८ लाख कोटींची कमाई

बाजारातील आजच्या चौफेर खरेदीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत ९.१८ लाख कोटींचा वाढ झाली. आज ७ ऑगस्ट रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४४८.७७ लाख कोटींवर पोहोचले. जे मंगळवारच्या ६ ऑगस्ट रोजीच्या सत्रात ४३९.५९ लाख कोटी रुपये होते. याचाच अर्थ आज बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ९.१८ लाख कोटींनी वाढले.

Sensex Today : टॉप गेनर्स शेअर्स कोणते?

सेन्सेक्सवर अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील, इन्फोसिस, मारुती, एम अँड एम, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स २ टक्क्यांनी वाढले. एलटी, बजाज फायनान्स, आयटीसी, एचडीएफसी बँक, सन फार्मा, एसबीआय, ॲक्सिस बँक, टाटा मोटर्स हे शेअर्स १ ते २ टक्क्यांपर्यंत वाढले. तर इंडसइंड बँक, टायटन या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

सेन्सेक्सवरील बहुतांश शेअर्स आज हिरव्या रंगात बंद झाले.

BSE ‍वर २,९८८ शेअर्स तेजीसह बंद

बीएसईवर आज ४,०३१ शेअर्समध्ये व्यवहार दिसून आला. यातील २,९८८ शेअर्स तेजीसह बंद झाले. तर ९४५ शेअर्समध्ये घसरण झाली. ९८ शेअर्समध्ये कोणताही बदल झाला नाही. तसेच १९६ शेअर्सनी आज ५२ आठवड्यांच्या उच्चांकाला स्पर्श केला. तर २४ शेअर्स ५२ आठवड्यांच्या निच्च्यांकावर आले.

निफ्टीवरील टॉप गेनर्स शेअर्स कोणते?

एनएसई निफ्टीवर ओएनजीसी, कोल इंडिया, अदानी एंटरप्रायजेस, अदानी पोर्ट्स, पॉवर ग्रिड हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर इंडसइंड बँक, टेक महिंद्रा, ब्रिटानिया या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

निफ्टी ५० चा आजचा ट्रेडिंग आलेख.

Stock Market | बाजारातील तेजीचे कारण काय?

सेन्सेक्स आणि निफ्टी आज बुधवारी सुमारे १ टक्के वाढले. बाजारातील तेजीत बँकिंग, मेटल आणि आयटी शेअर्स आघाडीवर होते. कारण जागतिक बाजारातील अमेरिकेच्या मंदीबद्दलची (US recession) चिंता कमी झाली आहे. तसेच देशांतर्गंत गुंतवणूकदारांच्या खरेदीच्या जोरावर बाजारात आज तेजीचा माहौल दिसून आला.

देशांतर्गत गुंतवणूकदारांचा खरेदीवर जोर कायम

दरम्यान, देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (Domestic institutional investors) मंगळवारही त्यांची खरेदी सुरू ठेवली. त्यांनी आज ३,३५७ कोटींच्या शेअर्सची खरेदी केली. सोमवारी त्यांनी ९,१५५ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT