आज सेन्सेक्स- निफ्टी १-१ टक्के वाढून बंद झाले. file photo
अर्थभान

सेन्सेक्स- निफ्टी १-१ टक्के वाढून बंद, गुंतवणूकदारांची ४.४२ लाख कोटींची कमाई

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

जागतिक मजबूत संकेत आणि अमेरिकेच्या श्रम बाजाराच्या आकडेवारीने जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेतील संभाव्य मंदीबद्दल चिंता कमी केल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजारात (Stock Market) आज शुक्रवारी (दि.९) जोरदार तेजी राहिली. आज सर्व क्षेत्रात चौफेर खरेदीचा माहौल दिसून आला. सेन्सेक्स (Sensex) ८१९ अंकांनी वाढून ७९,७०५ वर बंद झाला. तर निफ्टी (Nifty) २५० अंकांच्या वाढीसह २४,३६७ वर स्थिरावला. सेन्सेक्स आणि निफ्टी आज प्रत्येकी १ टक्के वाढले.

बाजारातील ठळक मुद्दे

  • आज सर्व क्षेत्रात चौफेर खरेदीचा माहौल.

  • सेन्सेक्स ८१९ अंकांनी वाढून ७९,७०५ वर बंद.

  • निफ्टी २५० अंकांच्या वाढीसह २४,३६७ वर स्थिरावला.

  • क्षेत्रीय आघाडीवर ऑटो, कॅपिटल गुड्स, आयटी, पॉवर वाढले.

  • बीएसई मिडकॅप निर्देशांक १.२ टक्क्याने वाढून बंद.

  • स्मॉलकॅप निर्देशांक ०.८ टक्क्याने वाढला.

  • ओला इलेक्ट्रिक शेअर्सला लागले २० टक्क्यांचे अप्पर सर्किट.

गुंतवणूकदारांनी कमावले ४.४२ लाख कोटींची कमाई

बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज ९ ऑगस्ट रोजी ४५०.१७ लाख कोटींवर पोहोचले. जे याआधी गुरुवारी ८ ऑगस्ट रोजी ४४५.७५ लाख कोटी होते. याचाच अर्थ आज BSE सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात आज ४.४२ लाख कोटींची वाढ झाली.

क्षेत्रीय आघाडीवर ऑटो, कॅपिटल गुड्स, आयटी, पॉवर, रियल्टी, पीएसयू बँक आणि मीडिया १ ते २ टक्क्यांनी वाढले. एकूणच आज सर्व क्षेत्रीय निर्देशांक हिरव्या रंगात बंद झाले. बीएसई मिडकॅप निर्देशांक १.२ टक्क्याने आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.८ टक्क्याने वाढला.

सेन्सेक्सवर एम अँड एम, टेक महिंद्रा टॉप गेनर्स

सेन्सेक्सवर टेक महिंद्रा, एम अँड एम, टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, एसबीआय, एचसीएल टेक, रिलायन्स, इन्फोसिस, बजाज फायनान्स, एशियन पेंट्स, टीसीएस, टायटन हे शेअर्स १ ते ३ टक्क्यांदरम्यान वाढले. एलटी, एशियन पेंट्स, टाटा स्टील, भारती एअरटेल हे शेअर्सही तेजीत राहिले.

सेन्सेक्सवरील आज बहुतांश शेअर्स आज हिरव्या रंगात बंद झाले.

निफ्टीवर आयशर मोटर्सचा शेअर्स ५ टक्क्यांनी वाढला

निफ्टीवर आयशर मोटर्स, श्रीराम फायनान्स, ओएनजीसी, एम अँड एम, टेक महिंद्रा हे शेअर्स २ ते ५ टक्क्यांपर्यंत वाढले. तर एचडीएफसी लाईफ, सन फार्मा, कोटक बँक या शेअर्समध्ये घसरण झाली.

निफ्टी 50 आज २४,३०० च्या वर स्थिरावला.

Ola Electric shares : २० टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये

ओला इलेक्ट्रिक शेअर्स आज शेअर बाजारात लिस्ट झाला. अडखळत सुरुवात केलेल्या या शेअर्सने नंतर २० टक्क्यांची वाढ नोंदवली. दुपारच्या व्यवहारात या शेअर्सला एनएसईवर २० टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले. हा शेअर्स ७६ रुपये आयपीओ किमतीच्या तुलनेत ९१ रुपयांपर्यंत वाढला.

बाजारातील तेजीचे कारण काय?

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, बेरोजगार म्हणून लाभ घेण्यासाठी नवीन अर्ज दाखल करणाऱ्या अमेरिकन लोकांची संख्या गेल्या आठवड्यात कमी झाली आहे. ३ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात राज्य बेरोजगारीचा लाभ मिळवण्यासाठीचे अर्ज १७ हजारांनी कमी झाली आहे. या अर्जाची संख्या २,३३,००० वर राहिली आहे. अमेरिकेच्या कामगार विभागाने गुरुवारी सांगितले की, सुमारे ११ महिन्यांतील ही सर्वात मोठी घसरण आहे. या आकडेवारीने शेअर बाजारातील संभाव्य मंदीची चिंता कमी झाल्याने गुंतवणूकदारांच्या भावना उंचावल्या आहेत. यामुळे भारतासह आशियाई बाजारात तेजी दिसून येत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT