BSE Sensex
सेन्सेक्स आज ६२० अंकांच्या वाढीसह ७८,६७४ वर बंद झाला. file photo
अर्थभान

Stock Market Closing Bell | पुन्हा तेजीचा वारू उधळला! सेन्सेक्स- निफ्टीचा नवा उच्चांक

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयसीआयसीआय बँकेच्या शेअर्समधील खरेदीच्या जोरावर भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीने बुधवारी (दि.२६) सर्वकालीन उच्चांकी पातळी गाठली. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजारातील तेजीचा वारु उधळला. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने जवळपास ७०० अंकांनी वाढून ७८,७५९ च्या उच्चांकाला स्पर्श केला. तर निफ्टीने २३,८८९ चा नवा उच्चांक नोंदवला. त्यानंतर सेन्सेक्स ६२० अंकांच्या वाढीसह ७८,६७४ वर बंद झाला. तर निफ्टी १४७ अंकांनी वाढून २३,८६८ वर स्थिरावला.

क्षेत्रीय निर्देशांकांची काय स्थिती?

क्षेत्रीय आघाडीवर बँक, ऑईल आणि गॅस, टेलिकॉम, मीडिया आणि FMCG मध्ये ०.३-२ टक्क्यांनी वाढ झाली. तर ऑटो, मेटल आणि रियल्टीमध्ये ०.७-१.५ टक्क्यांनी घसरण झाली. निफ्टी बँक, निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेसदेखील हिरव्या रंगात बंद झाले. बीएसई मिडकॅप निर्देशांक ०.२९ टक्क्यांनी घसरला. तर स्मॉलकॅप निर्देशांक सपाट पातळीवर बंद झाला.

'हे' हेवीवेट शेअर्स तेजीत

सेन्सेक्सवर रिलायन्सचा शेअर टॉप गेनर ठरला. हा शेअर्स ४ टक्क्यांनी वाढून ३ हजारांवर पोहोचला. भारती एअरटेलचा शेअर्स ३ टक्क्यांनी वाढला. अल्ट्राटेक सिमेंट, सन फार्मा, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, अदानी पोर्ट्स हे शेअर्सही १ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढले. तर एम अँड एम, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा हे शेअर्स घसरले.

सेन्सेक्सवरील शेअर्सची आजची स्थिती.

निफ्टीवरील टॉप गेनर्स शेअर्स कोणते?

निफ्टी ५० निर्देशांक आज २३,७२३ वर खुला झाला. त्यानंतर त्याने २३,८८९ च्या उच्चांक गाठला. निफ्टीवर रिलायन्स, भारती एअरटेल, अल्ट्राटेक सिमेंट, अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासीम, सन फार्मा हे शेअर्स सर्वाधिक वाढले. तर अपोलो हॉस्पिटल, एम अँड एम, बजाज ऑटो, हिंदाल्को, टाटा स्टील हे शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

निफ्टीवरील ट्रेडिंग आलेख.

Nifty Bank ५३ हजारांजवळ

निफ्टी बँक निर्देशांकांची घौडदौड सुरुच असून आज त्याने ५३ हजारांच्या जवळ जात नवीन विक्रमी उच्चांक गाठला. आजच्या व्यवहारात निफ्टी बँकने ५२,९८८ च्या अंकाला स्पर्श केला. त्यानंतर निफ्टी बँक ०.५ टक्के वाढीसह ५२,८७० वर बंद झाला.

परदेशी गुंतवणूकदारांचा खरेदीवर जोर

एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (FII) मंगळवारी १,१७५.९१ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सची खरेदी केली.

आशियाई बाजारात तेजी

आशियाई बाजारातील आज तेजी राहिली. आशियाई बाजारातील सेऊल, टोकियो, शांघाय आणि हाँगकाँग येथील निर्देशांकांनी वाढून व्यवहार केला.

SCROLL FOR NEXT