Stock Market Today Pudhari
अर्थभान

Stock Market Today: शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; सेन्सेक्स 300 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स तेजीत?

Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजाराने आठवड्याच्या शेवटी जोरदार सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेंसेक्स 300 अंकांनी वाढत 85,000 च्या वर पोहोचला, तर निफ्टीने 85 अंकांची वाढ घेत 26,000 च्या वर पोहोचला.

Rahul Shelke

Stock Market Today: देशांतर्गत शेअर बाजाराने आठवड्याच्या शेवटी जोरदार सुरुवात केली. सुरुवातीच्या व्यवहारात सेंसेक्स 300 अंकांनी वाढत 85,000 च्या वर पोहोचला, तर निफ्टीने 85 अंकांची वाढ घेत 26,000 च्या वर पोहोचला. मेटल शेअर्समध्ये प्रचंड खरेदीचा ओघ असून, आयटी इंडेक्समधील घसरण सोडल्यास सर्वच सेक्टोरल इंडेक्स हिरव्या रंगात व्यवहार करताना दिसले.

सुरुवातीचे आकडे

सेंसेक्स 233 अंकांनी वाढत 85,051 वर उघडला. निफ्टी 73 अंकांच्या वाढीसह 25,971 वर उघडला. बँक निफ्टीनेही 192 अंकांनी वाढ घेत 59,401 वर सुरुवात केली. चलन बाजारात मात्र रुपया घसरला आणि डॉलरसमोर ₹90.54 चा नवा ऐतिहासिक नीचांक गाठला.

निफ्टीतील टॉप गेनर्स आणि लूजर्स

गेनर्स:

L&T, Hindalco, Tata Steel, BEL, Ultratech Cement, Indigo, Axis Bank

लूजर्स:

Wipro, Infosys, Max Health, Bajaj Auto, Tech Mahindra, HUL, ITC, HCL Tech

मेटल शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाल्याने निफ्टी मेटल इंडेक्स आघाडीवर होता. आयटी शेअर्समध्ये मात्र घसरण होताना दिसत आहे.

जागतिक बाजारात तेजी

GIFT निफ्टी 135 अंकांच्या वाढीसह 26,150 च्या वर व्यवहार करत होता.
अमेरिकन निर्देशांकांमध्येही मोठी वाढ झाली.

  • डाऊ इंडस्ट्रियल्स 650 अंकांनी वाढला

  • S&P 500 ने नवा विक्रम केला

  • रसेल 2000 सलग चौथ्या दिवशी ऑल टाइम हायवर

  • जपानचा निक्केई 650 अंकांच्या वाढीसह उघडला.

  • या सकारात्मक संकेतांमुळे भारतीय बाजारातील गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला.

भारत–अमेरिका ट्रेड डील

भारत आणि अमेरिकेमधील ट्रेड डीलचा मार्ग मोकळा होत असल्याचे संकेत मिळताच बाजार आणखी वाढला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील फोनवरील चर्चेमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साह वाढला.

कमोडिटी मार्केटची स्थिती कशी आहे?

  • चांदीने 10,600 रुपयांची वाढ घेत 1,99,220 रुपयांचा नवा विक्रम केला

  • जागतिक बाजारातही चांदी 4% वाढून 64.50 डॉलरवर

  • सोने 2,900 रुपयांनी वाढून 1,32,550 रुपये

  • कच्चे तेल मात्र 1.5% घसरून 61 डॉलरजवळ स्थिर

  • डॉलर इंडेक्स दोन महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे.

एफआयआय–डीआयआयचे आकडे

  • एफआयआयची सलग 11व्या दिवशी विक्री, पण डेरिव्हेटिव्ह पोजिशनच्या आधारावर नेट 1,025 कोटींची खरेदी.

  • डीआयआयची 74 दिवसांची विक्रमी खरेदी, काल 3,800 कोटींची खरेदी झाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT