पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजार (Stock Market) गुरुवारी (दि.२ जानेवारी २०२५) तेजीत खुला झाला. सुरुवातीच्या व्यवहारात फायनान्सियल, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये वाढ दिसून आली. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) ३५० हून अधिक अंकांनी वाढून ७८,८७० वर पोहोचला. तर निफ्टी (Nifty) १०० अंकांच्या वाढीसह २३,८५० जवळ व्यवहार करत आहे.
सेन्सेक्सवर बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स प्रत्येकी २ टक्के वाढीसह टॉप गेनर्स आहेत. त्याचबरोबर कोटक बँक, इन्फोसिस, एम अँड एम, एचसीएल टेक, टीसीएस, टेक महिंद्रा हे शेअर्सही वाढले आहेत. तर सन फार्मा, एनटीपीसी, अदानी पोर्टस या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
बँक निफ्टी १०० हून अधिक अंकांनी वाढून व्यवहार करत आहे. निफ्टी ऑटो निर्देशांक २०० अंकांनी वाढला आहे. निफ्टी ऑटोवर अशोक लेलँड, एम अँड एम, मारुती, टीव्हीएस मोटर्स हे शेअर्स १ ते २.५ टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.