2024 मध्ये Nifty 50 आणि Sensex ने किती टक्के दिला रिटर्नस्?

26 डिसेंबर रोजी पार पडलेली एक्स्पायरी 2024 ची अखेरची एक्स्पायरी होती
10 percen returns year end summary
10 टक्के परताव्यासह वर्षाची सर्वसाधारण सांगता!Pudhari File Photo
Published on
Updated on
भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

गुरुवार, दिनांक 26 डिसेंबर रोजी पार पडलेली एक्स्पायरी ही केवळ साप्ताहिक एक्स्पायरी नव्हती, तर ती 2024 ची अखेरची एक्स्पायरी होती. त्या दिवशी बाजार पूर्णतः स्थितप्रज्ञ राहिला; पण दुसर्‍या दिवशी बाजारात बर्‍यापैकी तेजी दिसून आली. अद्याप वर्ष संपण्यास सोमवार आणि मंगळवार हे दोन दिवस असले, तरी वर्षाचा आढावा इथेच घेण्यास हरकत नसावी. Broader Level ला पाहिले, तर मार्केटने 2024 मध्ये खालीलप्रमाणे कामगिरी केली.

Nifty 50 - 10 % रिटर्नस्

Sensex - 9.25 %

Nifty Bank - 6.25 %

Nifty midcap - 25 %

Nifty small cap 26 %

सेक्टरल निर्देशांकांचा विचार केला, तर 2024 मध्ये सर्वाधिक परतावा (40 टक्के) Nifty Realty ने दिला. पाठोपाठ Nifty Pharma (38 टक्के) आणि Nifty Auto (27 टक्के) हे आघाडीवर राहिले. या तिन्ही सेक्टर्समधील सर्वाधिक तेजीत राहिलेले शेअर्स पुढीलप्रमाणे लार्ज कॅप कंपन्यांमध्ये Trent (Cmp Rs.7125) ने 140 टक्के, तर Shriram Finance (Cmp Rs. 2920.95) ने 120 टक्के असा सर्वात जास्त परतावा दिला. याउलट SBI Life Insurance आणि Tata Steel यांनी खराब कामगिरी केली. निफ्टी 50 मधील 50 पैकी 14 कंपन्यांनी दहा टक्क्यांच्या आत परतावा दिला. त्यामध्ये TCS, HDFC BANK, Maruti Suzuki, Tata Motors, Hero moto, L & T या रथी-महारथींचा समावेश होतो.

मिडकॅप कंपन्यांमध्ये Oracle Financial Services, Motilal Oswal Fi­­nancial Services, Dixon Technologies, Hitachi, Energy यांनी जवळपास 200 टक्के रिटर्नस दिले. स्मॉल कॅप कंपन्यांपैकी 88 कंपन्या या मल्टिबॅगर ठरल्या. त्यापैकी सर्वाधिक परतावा देणार्‍या आठ कंपन्या खालीलप्रमाणे आहेत. या कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांचे पैसे एका वर्षात पाच ते सहापट केले आहेत. FMGC आणि Energy सेक्टर्समधील कंपन्यांनी मागील वर्षी गुंतवणूकदारांची फार निराशा केली. गोदरेज इंडस्ट्रीज वगळता इतर FMCG कंपन्यांची कामगिरी अगदीच सुमार झाली. गोदरेज इंडस्ट्रीजने मात्र 60 टक्के परतावा दिला. ITC ने पाच टक्केही परतावा दिला नाही. एनर्जी सेक्टरमध्ये पॉवर ग्रीड आणि टाटा पॉवर यांनी अनुक्रमे 33 टक्के आणि 23 टक्के असा समाधानकारक परतावा दिला.

2024 चा पहिला सहामाही पूर्वाध चांगला गेला, तरी दुसरी सहामाही मात्र बाजाराच्या द़ृष्टीने आव्हानात्मक ठरली. विशेषतः ऑक्टोबर महिन्यात चीन सरकारने 1.4 ट्रिलियन डॉलर्सचे दिलेले Stimulus Package हे भारतीय बाजारासाठी खूपच गंभीर ठरले. FIIS ना चीनमध्ये अधिक संधी दिसल्यामुळे जवळपास 85,000 कोटी रुपयांचा Outflow भारतीय बाजारात दिसून आला; मात्र खरेदी बाजारासाठी दिलासादायक ठरली. दुसर्‍या तिमाहीचे कंपन्यांचे निराशादायक निकाल हेही बाजार खाली नेणारे कारण ठरले. रशिया - युक्रेन युद्ध, इस्त्रायल - हमास संघर्ष या गोष्टींची कृष्णछायाही जागतिक बाजारांवर होती. भारतामध्ये केंद्रीय निवडणुका पार पडून मोदी सरकार सलग तिसर्‍यांदा आरूढ झाले. त्यामुळे भारतीय बाजारात चैतन्य निर्माण झाले. अमेरिकेत ट्रम्प निवडून आल्यामुळे बिटकॉईनने गगनभरारी घेतली. नवीन वर्षामध्ये डॉलरचा उच्चांकी भाव हे एक आव्हान आहे. तिसर्‍या तिमाहीचे कंपन्यांचे निकाल कसे लागतील आणि 1 फेबु्रवारीला सादर होणारे अंदाजपत्रक कसे असेल, याकडे बाजाराचे आता लक्ष असेल. कारण, याच दोन गोष्टी भारतीय बाजाराची आगामी वर्षातील दिशा ठरवतील. तूर्तास येत्या आठवड्यासाठी ट्रेडर्सनी Caplin Point Lab, Finolex Pipes, Jupiter Wagans, Lupin, Texmaco Rail या शेअर्सच्या अभ्यास करावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news