Stock Market Closing Bell Sensex
सेन्सेक्स आज (दि.२२ जुलै) १०२ अंकांनी घसरून ८०,५०२ वर बंद झाला. file photo
अर्थभान

Stock Market Closing Bell | बजेटपूर्वी किरकोळ घसरणीसह सेन्सेक्स- निफ्टी बंद

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी सोमवारी (दि. २२) भारतीय शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली. सेन्सेक्स १०२ अंकांनी घसरून ८०,५०२ वर बंद झाला. तर निफ्टी २१ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,५०९ च्या सपाट पातळीवर स्थिरावला.

ठळक मुद्दे

  • बजेटपूर्वी शेअर बाजारात अस्थिरता.

  • सेन्सेक्स १०२ अंकांनी घसरून ८०,५०२ वर बंद.

  • निफ्टी २१ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,५०९ वर स्थिरावला.

  • बँक, आयटी, रियल्टी आणि एफएमसीजी शेअर्समध्ये विक्री

  • बीएसई मिडकॅप १.२ टक्क्यांनी वाढला.

  • बीएसई स्मॉलकॅप ०.८ टक्क्यांनी वाढून बंद.

  • सेन्सेक्सवर रिलायन्सचा शेअर्स ३ टक्क्यांनी घसरला.

  • निफ्टीवर विप्रोचा शेअर्स टॉप लूजर.

क्षेत्रीय निर्देशांकात ऑटो, कॅपिटल गुड्स, हेल्थकेअर, मेटल आणि पॉवर प्रत्येकी १ टक्के वाढले. तर बँक, आयटी, रियल्टी आणि एफएमसीजीमध्ये विक्री दिसून आली. तर बीएसई मिडकॅप १.२ टक्क्यांनी वाढला. तर बीएसई स्मॉलकॅप ०.८ टक्क्यांनी वाढून बंद झाला.

गुंतवणूकदारांची सावध भूमिका

अर्थमंत्री निर्मला सीतारामन उद्या मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प २०२४ संसदेत सादर करतील. तर आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर करण्यात आला. केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी आज गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घेतली. यामुळे सेन्सेक्स सलग दुसऱ्या सत्रात घसरला आहे.

रिलायन्सचा शेअर्स ३ टक्क्यांनी घसरला

सेन्सेक्सवर कोटक बँक, रिलायन्स हे शेअर्स प्रत्येकी ३ टक्क्यांनी अधिक घसरले. दुपारच्या व्यवहारात रिलायन्सचा शेअर्स ३.५ टक्के घसरणीसह ३,००१ रुपयांवर होता. त्याचबरोबर आयटीसी, एसबीआय, एचसीएल टेक, बजाज फायनान्स हे शेअर्समध्ये घसरण दिसून आली. तर एनटीपीसी, एचडीएफसी बँक, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, एम अँड एम, टाटा स्टील, टाटा मोटर्स, सन फार्मा, इन्फोसिस, मारुती हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले.

सेन्सेक्सवर कोटक बँक, रिलायन्स हे शेअर्स प्रत्येकी ३ टक्क्यांनी अधिक घसरले.

विप्रो शेअर्सची ९ टक्क्यांनी घसरण

निफ्टीवर विप्रोचा शेअर्स टॉप लूजर ठरला. विप्रोचा शेअर्स (Wipro Share Price) आज एनएसई निफ्टीवर ९ टक्क्यांनी घसरून ५०६ रुपयांवर आला. जून २०२४ मध्ये संपलेल्या तिमाहीत IT कंपनी विप्रोने निव्वळ नफ्यात वार्षिक ४.६ टक्के वाढ नोंदवूनही त्यांचे शेअर्स आजच्या व्यवहारात घसरले. निफ्टीवर विप्रोसह रिलायन्स, कोटक बँक, आयटीसी, एसबीआय लाईफ यांचे शेअर्स घसरले. दरम्यान, ग्रासीम, एचडीएफसी बँक, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, एम अँड एम हे शेअर्स तेजीत राहिले.

निफ्टी ५० चा आजचा ट्रेडिंग आलेख.
SCROLL FOR NEXT