BSE Sensex
आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने ७५० अंकांनी वाढून ८१,५२२ च्या नव्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. file photo
अर्थभान

Stock Market Closing Bell | तेजीचा चौकार! बजेटपूर्वी शेअर बाजाराने तोडले रेकॉर्ड

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय शेअर बाजाराने आज गुरुवारी (दि. १८) सलग चौथ्या सत्रांत तेजी कायम राखत नवे शिखर गाठले. आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्सने (Sensex) ७५० अंकांनी वाढून ८१,५२२ च्या नव्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. सेन्सेक्स ८१ हजार पार होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यानंतर सेन्सेक्स ६२६ अंकांच्या वाढीसह ८१,३४३ वर बंद झाला. तर निफ्टीने आज २४,८३७ चा नवा विक्रम नोंदवला. त्यानंतर निफ्टी (Nifty 50) १८७ अंकांच्या वाढीसह २४,८०० वर स्थिरावला. बाजारातील आजच्या विक्रमी तेजीला आयटी, बँक आणि एफएमसीजी हा स्टॉक्समधील खरेदीमुळे सपोर्ट मिळाला. विशेष म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पापूर्वी बाजारात तेजी आली आहे. (Stock Market Closing Bell)

ठळक मुद्दे

  • शेअर बाजारात सलग चौथ्या सत्रांत तेजी कायम.

  • सेन्सेक्स पहिल्यांदाच ८१ हजार पार.

  • निफ्टीचा २४,८३७ च्या नव्या उच्चांकाला स्पर्श.

  • आयटी, बँक आणि एफएमसीजी स्टॉक्समध्ये जोरदार खरेदी.

  • कॅपिटल गुड्स, मेटल, पॉवर, मीडिया निर्देशांक घसरले.

  • बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप सुमारे १ टक्क्याने घसरले.

क्षेत्रीय निर्देशांकांची काय स्थिती?

क्षेत्रीय निर्देशांकात बँक, ऑटो, आयटी, एफएमसीजी आणि टेलिकॉम ०.३ ते २ टक्क्यांनी वाढले. तर कॅपिटल गुड्स, मेटल, पॉवर, मीडिया १ ते ३ टक्क्यांनी घसरले. तर बीएसई मिडकॅप सुमारे १ टक्के आणि स्मॉलकॅप १.१ टक्क्यांनी घसरला.

'या' हेवीवेट्स शेअर्समध्ये जोरदार खरेदी

टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS), इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक (ICICI), रिलायन्स इंडस्ट्रीज, हिंदुस्तान युनिलिव्हर आणि एम अँड यासारख्या हेवीवेट्स शेअर्समधील खरेदीमुळे सेन्सेक्स- निफ्टी निर्देशांक उंचावले.

कोणते शेअर्स वधारले?

जागतिक कमकुवत संकेतांमुळे सेन्सेक्सची सुरुवात आज घसरणीसह झाली होती. पण त्यानंतर तो सपाट पातळीवर आला आणि तेथून त्याने विक्रमी उच्चांकावर झेप घेतली. सेन्सेक्सवर टीसीएसचा शेअर्स टॉप गेनर ठरला. टीसीएसचा शेअर्स ३ टक्क्यांनी वाढून ४,३२४ रुपयांपर्यंत वाढला. त्याचबरोबर बजाज फिनसर्व्ह, एम अँड एम, हिंदुस्तान युनिलिव्हर, एचसीएल टेक, इन्फोसिस, एसबीआय, टेक महिंद्रा, कोटक बँक, भारती एअरटेल हे शेअर्सही वाढले. तर एशियन पेंट्स, एनटीपीसी, टाटा स्टील, पॉवर ग्रिड हे शेअर्स घसरले. बीएसई सेन्सेक्सवरील ३० पैकी २२ शेअर्स आज वाढून बंद झाले.

बीएसई सेन्सेक्सवरील ३० पैकी २२ शेअर्स आज वाढून बंद झाले.

निफ्टीवर टीसीएस, LTIMindtree, बजाज फिनसर्व्ह, एसबीआय लाईफ, ओएनजीसी हे शेअर्स २ ते ३ टक्क्यांपर्यंत वाढून टॉप गेनर्स राहिले. तर एशियन पेंट्स, हिरो मोटोकॉर्प, कोल इंडिया, ग्रासीम, बजाज ऑटो हे शेअर्स टॉप लूजर्स ठरले.

निफ्टी ५० चा आजचा ट्रेडिंग आलेख.
SCROLL FOR NEXT