बुधवारी (दि. ९ एप्रिल) सेन्सेक्स ३७९ अंकांनी घसरून ७३,८४७ वर बंद झाला.  (AI Image)
अर्थभान

RBI च्या रेपो दर कपातीनंतरही शेअर बाजार लाल रंगात बंद, PSU Bank शेअर्समध्ये मोठी घसरण

Stock Market Closing | जाणून घ्या बाजारात आज काय घडलं?

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो दरात कपात करूनही वाढत्या व्यापार युद्धाचे सावट भारतीय शेअर बाजारावर बुधवारी (दि.९) कायम राहिले. सेन्सेक्स ३७९ अंकांनी घसरून ७३,८४७ वर बंद झाला. तर निफ्टी ५० निर्देशांक १३६ अंकांनी घसरून २२,३९९ पर्यंत खाली आला. आयटी, मेटल, फार्मा आणि पीएसयू बँक शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने (RBI MPC Meeting) आज रेपो दर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करून ६ टक्क्यांपर्यंत खाली आणला. पण आरबीआयने आर्थिक वर्ष २०२६ साठीचा जीडीपी वाढीचा अंदाज ६.७ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांपर्यंत कमी केल्यानंतर बाजारातील भावना बिघडल्या.

Sensex Today | कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्सवर एसबीआय, टेक महिंद्रा, एलटी हे शेअर्स प्रत्येकी ३ टक्के घसरले. टाटा स्टील, सन फार्मा, इन्फोसिस, एचसीएल टेक, टीसीएस, ॲक्सिस बँक हे शेअर्स १ ते २ टक्के घसरले. तर दुसरीकडे नेस्ले इंडिया, हिंदुस्तान युनिलिव्हर, पॉवर ग्रिड, टायटन, अल्ट्राटेक सिमेंट हे शेअर्स १ ते ३ टक्के वाढले.

बीएसईवर आज घसरणीसह बंद झालेल्या शेअर्सची संख्या अधिक राहिली. यावर आज एकूण ४,०३० शेअर्समध्ये व्यवहार दिसून आला. यातील १,५३४ शेअर्स तेजीसह बंद झाले. तर २,३५२ शेअर्समध्ये घसरण झाली. १४४ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही.

Nifty PSU Bank | सरकारी बँकिंग शेअर्संना फटका

निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक आज २.५ टक्के घसरला. तर निफ्टी आयटीला मोठा फटका बसला. निफ्टी आयटी २ टक्के घसरला. फार्मा आणि मेटल शेअर्सही १ टक्केहून अधिक घसरले. दरम्यान, एफएमसीजी (Nifty FMCG) शेअर्सनी आज चांगली कामगिरी केली. बीएसई मिडकॅप ०.७ टक्के आणि स्मॉलकॅप १ टक्के घसरला.

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दर २५ बेसिस पॉइंट्सने कमी करून ६ टक्क्यांपर्यंत खाली आणला. तसेच आरबीआयने त्यांची पतधोरणविषयक भूमिका 'तटस्थ' वरून 'अनुकूल' अशी करुनही आज बँकिंग शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले. निफ्टी पीएसयू बँक निर्देशांक (Nifty PSU Bank) २.५ टक्के घसरला. सेंट्रल बँक, इंडियन बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, एसबीआय आणि बँक ऑफ बडोदा यांचे शेअर्स जवळपास २ ते ४ टक्क्यांपर्यंत घसरले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT