सेन्सेक्स १३१ अंकांनी वाढून ७७,३४१ वर बंद झाला. File photo
अर्थभान

Stock Market Closing Bell | सेन्सेक्स तेजीत बंद, गुंतवणूकदारांनी कमावले १.२७ लाख कोटी

दीपक दि. भांदिगरे

भारतीय शेअर बाजारातील आज सोमवारच्या (दि. २४) अस्थिर सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टी किरकोळ वाढीसह बंद झाले. सेन्सेक्स १३१ अंकांनी वाढून ७७,३४१ वर बंद झाला. तर निफ्टी ३६ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २३,५३७ वर स्थिरावला. जागतिक बाजारातील सुस्त संकेतांदरम्यान सेन्सेक्स, निफ्टीची सुरुवात घसरणीसह झाली होती. पण त्यानंतर दोन्ही निर्देशांकात रिकव्हरी दिसून आली.

बाजारात आज नेमकं काय घडलं?

  • सेन्सेक्स १३१ अंकांनी वाढून बंद.

  • निफ्टी २३,५३७ वर स्थिरावला.

  • कॅपिटल गुड्स, ऑटो, एफएमसीजी शेअर्स तेजीत.

  • कन्झ्यूमर ड्यरेबल्स, एनर्जी, मेटल शेअर्समध्ये घसरण

  • बीएसई मिडकॅप ०.३ टक्क्यांनी तर स्मॉलकॅप ०.२ टक्क्यांनी वाढला.

गुंतवणूकदारांना १.२७ लाख कोटींचा फायदा

२४ जून रोजी बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ४३५.७५ लाख कोटींवर पोहोचले. याआधी शुक्रवारी २१ जून रोजी ते ४३४.४८ लाख कोटींवर होते. याचाच अर्थ आज ‍BSE सूचीबद्ध कंपन्यांच्या बाजार भांडवलात १.२७ लाख कोटींची वाढ झाली.

क्षेत्रीय आघाडीवर काय स्थिती?

कॅपिटल गुड्स, ऑटो, एफएमसीजी, टेलिकॉम आणि पॉवर निर्देशांक ०.५-१ टक्क्यांनी वाढले. तर मेटल, ऑईल आणि गॅस, पीएसयू बँक आणि मीडिया ०.५-१ टक्क्यांनी घसरले. बीएसई मिडकॅप ०.३ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप निर्देशांक ०.२ टक्क्यांनी वाढला.

कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्स आज ७६,८८५ वर खुला झाला होता. त्यानंतर तो ७७,२०० च्या वर राहिला. सेन्सेक्सवर एम अँड एम, पॉवर ग्रिड, सन फार्मा, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, आयसीआयसीआय बँक हे शेअर्स वाढले. तर इंडसइंड बँक, अदानी पोर्ट्स, टाटा स्टील, रिलायन्स, बजाज फायनान्स, ॲक्सिस बँक या शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

सेन्सेक्सवरील शेअर्स.

निफ्टीवर एम अँड एम, पॉवर ग्रिड, श्रीराम फायनान्स, सन फार्मा, ग्रासीम हे शेअर्स प्रत्येकी २ टक्क्यांनी वाढले. तर सिप्ला, इंडसइंड बँक, अदानी पोर्ट्स, कोल इंडिया, टाटा स्टील हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले.

निफ्टी ट्रेडिंग आलेख.

रेमंडचे शेअर्सचे तेजीत

रेमंडचे शेअर्स (Raymond Share Price) आज ६ टक्क्यांनी वाढून बीएसईवर २,६७५ रुपयांच्या उच्चांकावर पोहोचले. त्यानंतर दुपारच्या व्यवहारात या शेअर्सने ३ टक्के वाढीसह २,६०५ रुपयांवर व्यवहार केला. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल (NCLT) ने या कंपनीच्या लाईफस्टाइल बिझनेसचे विभाजन आणि कन्झ्यूमर ट्रेडिंग शाखेचे एकत्रीकरणास मान्यता दिली आहे. या पार्श्वभूमीवर रेमंडचे शेअर्स वधारले.

Fertilizer stocks घसरले

फर्टिलायझर्स कंपन्यांचे शेअर्स आज ९ टक्क्यांपर्यंत घसरले. फर्टिलायझर्स अँड केमिकल्स त्रावणकोर, GNFC, GSFC आणि मद्रास फर्टिलायझर्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण दिसून आली. जीएसटी (GST) कौन्सिलने फर्टिलायझर्स क्षेत्राला सध्याच्या ५ टक्क्यांच्या GST मधून सूट देऊन दरात दरात सुसूत्रता आणण्याची शिफारस मंत्री गटाकडे पाठवली आहे. या पार्श्वभूमीवर फर्टिलायझर्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये बदल दिसून आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT