Stock market : गुंतवणूकदारांना तेजीची आशा!

शेअर बाजारात गुंतवणूकदारांना तेजीची वाटचाल
Sensex and Nifty 50 rose by just half a percent
सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये केवळ अर्ध्या टक्क्यांची वाढPudhari File Photo
भरत साळोखे, संचालक, अक्षय प्रॉफिट अँड वेल्थ प्रा. लि.

सेन्सेक्स आणि निफ्टी 50 मध्ये केवळ अर्ध्या टक्क्यांची वाढ दर्शवत भारतीय शेअर बाजाराने सुस्त राहणे पसंत केले. निफ्टी बँक मात्र साडेतीन टक्क्यांहून अधिक वाढला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप इंडेक्सही अनुक्रमे दीड टक्का आणि पावणेदोन टक्के वाढले. सामान्य गुंतवणूकदारांमध्ये तेजीविषयी प्रचंड आशावाद आहे, त्याचे हे द्योतक आहे. त्यामुळेच सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी नफा वसुली होऊनही निफ्टीने 23500 ची (23501.10) आणि सेन्सेक्सने 77000 ची (77209.90) पातळी सोडली नाही. मार्केट Consolidation च्या स्थितीत राहण्याचा प्रयत्न करत असले तरी शुक्रवारी सकाळच्या सत्रात निफ्टीने 23667.10 या आपल्या आतापर्यंतच्या उच्चांकाला गवसणी घातली. सेन्सेक्स आणि निफ्टी बँकही अनुक्रमे 77000 च्या पुढे आणि 51900 च्या पुढे जाऊन आले. त्यामुळे या महिन्यात निफ्टी 24000 पार करेल, असे वाटते.

खत कंपन्यांच्या शेअर्सनीही 52 Week High चे उच्चांक

4 जून रोजी निवडणुकांचे प्रत्यक्ष निकाल एक्झिट पोल्सच्या आकड्यांच्या विपरीत लागले तेव्हा भारतीय बाजाराने जी आपटी खाल्ली, त्याची भरपाई मोदी पंतप्रधान झाल्यामुळे बाजार रोज करतो आहे. निफ्टी 1617 पॉईंटस् तर सेन्सेक्स 5124 पॉईंटस् मागील पंधरा दिवसात वाढला आहे. GDP वाढीचा अंदाज, व्याज दर कमी होण्याची अपेक्षा, समाधानकारक पावसाची शक्यता या बाबींबरोबरच पुढील महिन्यात सादर होणारा अर्थसंकल्प हा बाजारातील तेजी टिकवून ठेवत आहे. FII चा ओघ पुन्हा भारतीय बाजाराकडे वळल्यामुळे तेजीची आशा मजबूत झाली आहे. गत सप्ताहातही जवळपास DII च्या बरोबरीने FII नी निव्वळ खरेदी केली (रु.9102.87 कोटी) दरवर्षी पावसाच्या सुरुवातीला फर्टीलायझर कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी येते. FACT (Fertilizers & Chemicals Travancore) चा शेअर सप्ताहात 47 टक्के वाढला. (रु. 1134.45) त्याच्या बरोबरीने खालील इतर खत कंपन्यांच्या शेअर्सनीही 52 Week High चे उच्चांक नोंदवले. RCF - Rs. 202.79, Chambal - Rs. 517.10, Deepak Fertilizers & - Rs. 685.95

रेल्वे, डिफेन्स शेअर्समध्ये तेजी

सेरा सॅनिटरी वेअरचा शेअर, शुक्रवारी साडेदहा टक्के, तर सप्ताहात बावीस टक्के वाढला. 1 सप्टेंबर 2023 रोजी त्याने रु. 9740 चा उच्चांक नोंदवला होता. तेव्हा थोड्याच दिवसात हा 10000 चा टप्पा पार करेल असे वाटले होते. आता पुन्हा एकदा तो 10000 च्या दिशेने वाटचाल करू लागला आहे.

गेल्या काही दिवसांमध्ये आपण रेल्वे, डिफेन्स शेअर्समध्ये तेजी अनुभवली रेल्वेचे आधुनिकीकरण हा मोदी सरकारच्या अजेंड्यावरील अग्रक्रमाचा विषय आहे. त्यामुळे या रेल्वे कंपन्यांना चांगल्या वर्क ऑर्डर्स मिळत आहेत. या वर्क ऑर्डर्सच्या रकमेवरून रेल्वे कंपन्यांचे Ranking नुकतेच एके ठिकाणी प्रसिद्धी झाले आहे. ते खालीलप्रमाणे :

1) RVNL - Rs. 85000 Cr CMP Rs. 409.90

2) Titagarh - Rs. 28076 Cr CMP Rs. 1595

3) Ircon - Rs. 27208 Cr CMP Rs. 276.95

4) Texmaco Rail - Rs. 8000 Cr CMP Rs. 216.00

5) Jupiter Wagons - Rs. 7101 Cr CMP Rs. 695.30

6) Rites - Rs. 5690 Cr CMP Rs. 706.80

7) Railtel - Rs. 4700 Cr CMP Rs. 475.70

8) Oriented Rail - Rs. 1549 Cr CMP Rs. 282.25

ग्लोबल ब्रोकरेज फर्मचा या कंपन्यांमध्ये गुंतवणूक टाळण्याचा सल्ला

ग्लोबल ब्रोकरेज फर्म Macquarie चा एक रिपोर्ट नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्यात फर्मने सरकारी बँका, काही नॉन बँकिंग, फायनान्स कंपन्या, इन्श्युरन्स कंपन्या आणि फिनटेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक टाळण्याचा सल्ला दिला आहे. त्यानुसार SBI, Bajaj, Finance, Cholamandalam आणि M & M Finace ह्या कंपन्यांचे रेटिंग Neutral वरून Underperform केले आहे. त्याचबरोबर संपूर्ण लाईफ इन्श्युरन्स सेक्टर पूर्णपणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. मात्र SBI Life Insurance चा अपवाद केला आहे. इतकेच नव्हे, तर Outperform चे रेटिंग वाढवून हा शेअर या सेक्टरला लीड करेल, असे म्हटले आहे. खासगी बँकांचे रेटिंग वाढवून Outperform असे रेटिंग केले आहे. त्यामध्ये अ‍ॅक्सिस बँक, बंधन बँक, सिटी युनियन बँक, कोटक बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक यांचा समावेश आहे. येणार्‍या अंदाजपत्रकामध्ये शेअर बाजाराच्या द़ृष्टीने कोणकोणत्या सेक्टर्सना बस्टर मिळेल. या चर्चेबरोबरच आणखी एक चर्चा आहे, ती म्हणजे डेरीव्हेटीव्ज ट्रेडिंगला लगाम घालण्याची तीव्र गरज.

डेरीव्हेटीव्ह ट्रेडिंगमधील 2024 मधील आकडा रु. 7000 कोटी

एक चर्चा जोरदार तेजीत आहे ती ही की, सध्या फ्यूचर्स आणि ऑपशन्समधील टे्रडिंगपासून मिळणारा इन्कम हा Business Income च्या वर्गवारीत धरला जातो, त्यामुळे तो गुंतवणूकदाराच्या Tax Slab नुसार करपात्र धरला जातो. शिवाय त्यातून तोटा झाल्यास इतर इन्कममधून तो वजाही होतो; परंतु डेरीव्हेटीव्जमधील टे्रडिंगला सध्या आलेले जुगाराचे स्वरूप, तरुण पिढीचा त्यामधील धोकादायक सहभाग आणि 90 टक्के टे्रडर्सचे त्यामध्ये होणारे नुकसान पाहता, डेरीव्हेटीव्ज ट्रेडिंगला लगाम घालण्याची तीव्र निकड सेबी आणि रिझर्व्ह बँक दोहोंनाही वाटत आहे. वास्तविक, अनेक इशारे देऊन झाले; परंतु यामधील ट्रेंडिंग दिवसेंदिवस वाढतच आहे. मार्च 2020 मध्ये 250 कोटी रुपयांचे डेरीव्हेटीव्ज ट्रेडिंग झाले होते. मार्च 2024 मधील हाच आकडा रु. 7000 कोटी इतका आहे. त्यामुळे डेरीव्हेटीव्ह ट्रेडिंगमधील इन्कम यापुढे लॉटरी आणि क्रिप्टो करन्सीमधील इन्कमच्या वर्गवारीत धरला जाण्याची शक्यता आहे. परिणामी, त्यावरील टॅक्सचे प्रमाण तर वाढेलच. शिवाय टीडीएसही लागू होईल.

सेन्सेक्सच्या नियमित Rebalancing नुसार सोमवारपासून सेन्सेक्समध्ये विप्रोच्या जागी अदानी पोर्टस्चा समावेश होईल.

आता एक मनोरंजक बातमी! BSE चे CEO सुंदरम राममूर्ती यांच्या वार्षिक वेतनामध्ये यावर्षी तब्बल 417 टक्के वाढ झाली. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये त्यांनी रु.1.05 कोटी इतके वेतन घेतले, तर 2023-24 मध्ये रु.5.40 कोटी इतके वेतन घेतले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news