सेन्सेक्स, निफ्टीत आज घसरण दिसून येत आहे. file photo
अर्थभान

RBI MPC इम्पॅक्ट! शेअर बाजारात चढ-उतार, कोणत्या शेअर्सवर परिणाम?

Stock Market Updates | जाणून घ्या आजचे मार्केट

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर गुरुवारी (दि.८) भारतीय शेअर बाजारात चढ-उतार दिसून आली. सेन्सेक्स ३०० अंकांनी घसरून ७९,१५० वर तर निफ्टी २४,२०० च्या खाली आला. पण त्यानंतर काही वेळातच दोन्ही निर्देशांकांनी रिकव्हरी करत तेजीच्या दिशेने चाल केली. बँक, ऑटो आणि रिअल इस्टेटशी संबंधित व्याजदर संवेदनशील निर्देशांक कमी प्रमाणात व्यवहार करत आहेत.

रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम

"पतविषयक धोरण समितीने पॉलिसी (RBI MPC) रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम ठेवण्याचा निर्णय ४:२ बहुमताने घेतला आहे. तसेच स्थायी ठेव सुविधा (SDF) दर ६.२५ टक्के एवढा कायम राहील आणि सीमांत स्थायी सुविधा (MSF) दर आणि बँक दर ६.७५ टक्के राहील..." असे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास (RBI governor Shaktikanta Das) यांनी सांगितले. तसेच आरबीआयने २०२५ साठीचा महागाईचा अंदाज ४.५ टक्क्यांवर जैसे थे ठेवला आहे. तसेच वास्तविक जीडीपी ७.२ टक्क्यांच्या वाढीचा अंदाजही कायम ठेवला आहे.

कोणते शेअर्स घसरले?

सेन्सेक्सवर एशियन पेंट्स, इन्फोसिस, अल्ट्राटेक सिमेंट, टाटा स्टील, एलटी, पॉवर ग्रिड, जेएसडब्ल्यू स्टील, नेस्ले इंडिया, एनटीपीसी, मारुती, बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले आहेत. तर टाटा मोटर्स, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, एसबीआय हे शेअर्स वाढले आहेत.

निफ्टीवर एशियन पेंट्स, ग्रासीम, इन्फोसिस, पॉवर ग्रिड हे शेअर्स घसरले आहेत. टाटा मोटर्स, एचडीएफसी बँक, सिप्ला, भारती एअरटेल, एचडीएफसी लाईफ हे शेअर्स तेजीत आहेत.

Global Markets | जागतिक बाजार

अमेरिकेच्या शेअर बाजारातील निर्देशांक काल घसरून बंद झाले. विशेषतः टेक्नॉलॉजी स्टॉक्समध्ये अधिक घसरण दिसून आली. त्यानंतर आज आशियाई बाजारातही घसरण झाली. एमएससीआय एशिया एक्स-जपान निर्देशांक ०.७ टक्क्यांनी घसरला.

परदेशी गुंतवणूकदारांचा (FII) विक्रीवर जोर

परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (foreign institutional investors) बुधवारी भारतीय शेअर्सची विक्री कायम ठेवली. त्यांनी बुधवारी ३,३१४ कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री केली. तर देशांतर्गत संस्थागत गुंतवणूकदारांनी याच दिवशी ३,९०१ कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT