आज निफ्टी बँकेने ५२,११८ च्या नव्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला.  NSE
अर्थभान

Nifty Bank चा नवा उच्चांक! पहिल्यांदाच ५२,१०० पार

दीपक दि. भांदिगरे

बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्सची मंगळवारी (दि.२५) तेजी कायम राहिली. सकाळच्या व्यवहारात सेन्सेक्स २५० अंकांनी वाढून ७७,६०० जवळ पोहोचला. तर निफ्टीने २३,६१८ च्या उच्चांकाला स्पर्श केला. फायनान्सियल आणि बँकिंग शेअर्समधील तेजीचा बाजारातील वाढीला सपोर्ट मिळाला आहे. रियल्टी निर्देशांक वगळता बहुतांश क्षेत्रांमध्ये खरेदी झाल्याने स्मॉलकॅप्स मजबूत स्थितीत व्यवहार करत आहे. दरम्यान, आज निफ्टी बँकेने ५२,११८ च्या नव्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला.

१३ क्षेत्रीय निर्देशांकांपैकी एनर्जी, आयटी, एफएमसीजी, रियल्टी आणि मेटल घसरले आहेत. तर आणि ऑटो आणि PSU Bank निर्देशांक तेजीत व्यवहार करत आहे.

टॉप गेनर्स शेअर्स

सेन्सेक्सवर अल्ट्राटेक सिमेंट, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, एसबीआय हे शेअर्स वाढून व्यवहार करत आहेत. तर अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, पॉवर ग्रिड या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे.

निफ्टीवर अल्ट्राटेक सिमेंट, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक, डिव्हिस लॅब, ब्रिटानिया हे शेअर्स टॉप गेनर्स आहेत. तर बीपीसीएल, एसबीआय लाईफ, अदानी पोर्ट्स, ओएनजीसी, एनटीपीसी हे शेअर्स टॉप लूजर्स आहेत.

निफ्टी बॅंक ट्रेडिंग आलेख.

Nifty Bank चा नवा उच्चांक

निफ्टी बँकेने आजच्या ट्रेडिंग सत्रात ५२,११८ च्या नव्या विक्रमी उच्चांकाला स्पर्श केला. निफ्टी बँकवर ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, AU Small Finance Bank, एसबीआय, फेडरल बँक हे शेअर्स वाढले आहेत. बंधन बँक, पीएनबीमध्ये घसरण झाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT