Stock Market Closing Bell ‍BSE Sensex
बजेटपूर्वी सेन्सेक्स आज सपाट पातळीवर व्यवहार करत आहे. file photo
अर्थभान

Stock Market Updates Budget 2024 | बजेटपूर्वी सेन्सेक्स- निफ्टी सपाट, कोणते शेअर्स तेजीत?

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मंगळवारी (दि.२३) संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प (Budget 2024) सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भारतीय शेअर बाजाराने आज हिरव्या रंगात व्यवहार सुरु केला. सेन्सेक्स २२९ अंकांनी वाढून ८०,७०० वर खुला झाला. त्यानंतर काहीवेळातच तो ८०,६०० च्या खाली आला. तर निफ्टी २४,५०० च्या सपाट पातळीवर व्यवहार करत आहे. (Stock Market Updates) आज मेटल शेअर्सवर दबाव दिसून येत आहे.

कोणते शेअर्स तेजीत?

सेन्सेक्सवर एनटीपीसी, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट, एलटी, हिंदुस्तान युनिलिव्हर हे शेअर्स तेजीत आहेत. तर पॉवर ग्रिड, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, एचसीएल टेक, एचडीएफसी बँक या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. बीएसई मिडकॅपमध्ये घसरण दिसून येत आहे. तर बीएसई स्मॉलकॅप सपाट झाला आहे.

एनएसई निफ्टीवर आयशर मोटर्स, एनटीपीसी, आयटीसी, ग्रासीम, अपोलो हॉस्पिटल हे शेअर्स प्रत्येकी १ टक्के वाढले आहेत. तर श्रीराम फायनान्स, हिंदाल्को, बीपीसीएल, जेएसडब्ल्यू स्टील, ओएनजीसी हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी घसरले आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधी सोमवारी (दि. २२) भारतीय शेअर बाजारात अस्थिरता दिसून आली होती. सेन्सेक्स १०२ अंकांनी घसरून ८०,५०२ वर बंद झाला होता. तर निफ्टी २१ अंकांच्या किरकोळ घसरणीसह २४,५०९ च्या सपाट पातळीवर स्थिरावला होता. आज दोन्ही निर्देशांक सपाट झाले आहेत.

SCROLL FOR NEXT