सेन्सेक्स ८० हजारांच्या खाली घसरला आहे. file photo
अर्थभान

Stock Market Updates | सेन्सेक्स ८० हजारांच्या खाली, Nifty Bank ‍‍वर दबाव

जाणून घ्या आजचे शेअर मार्केट

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

शेअर बाजारातील दोन दिवसांच्या विक्रमी तेजीला शुक्रवारी (दि.५) ब्रेक लागला. हेवीवेट एचडीएफसी बँकेच्या शेअर्समधील घसरणीने शेअर बाजाराला (Stock Market Updates) खाली ओढले आहे. सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स (Sensex) सुमारे ५०० अंकांनी घसरून ७९,५०० वर आला. तर निफ्टी (Nifty) २४,२०० पर्यंत खाली आला. सकाळी साडेदहाच्या सुमारास सेन्सेक्स ७९,७०० वर व्यवहार करत होता. Nifty Bank ‍‍वर दबाव दिसून आला आहे. तर आयटी आणि फार्मा शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. या आठवड्यात बाजारातील तेजीनंतर प्रॉफिट बुकिंग दिसून आले. निफ्टी बँक आणि ऑटो निर्देशांक खाली आले आहेत.

बाजारातील सुरुवातीची स्थिती

  • शेअर बाजारातील दोन दिवसांच्या विक्रमी तेजीला ब्रेक.

  • सेन्सेक्स, निफ्टी घसरणीसह खुले.

  • निफ्टी बँक आणि ऑटो निर्देशांकही घसरले.

  • HDFC Bank चा शेअर्स ४ टक्क्यांनी घसरला.

  • बीएसई मिडकॅप, स्मॉलकॅपचा हिरव्या रंगात व्यवहार.

  • फार्मा शेअर्सही तेजीत.

सेन्सेक्सने गुरुवारच्या ट्रेड्रिंग सत्रात ८०,३९२ च्या उच्चांकाला स्पर्श केला होता. त्यानंतर तो ६२ अंकांच्या किरकोळ वाढीसह ८०,०४९ वर स्थिरावला होता. तर निफ्टीने २४,४०१ चा नवा उच्चांक गाठला आणि त्यानंतर तो १५ अंकांनी किरकोळ वाढून २४,३०२ वर बंद झाला होता.

सेन्सेक्सवर स्थिती काय?

सेन्सेक्सवर एचडीएफसी बँकचा शेअर्स टॉप लूजर ठरला आहे. एचडीएफसी बँकेचा शेअर्स ४ टक्क्यांनी घसरून १,६५० रुपयांपर्यंत खाली आला. त्याचसोबत एम अँड एम, टायटन, टाटा स्टील, इंडसइंड बँक या शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. एलटी, रिलायन्स, जेएसडब्लू स्टील, एसबीआय, एनटीपीसी, सन फार्मा हे शेअर्स तेजीत आहेत. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप हिरव्या रंगात व्यवहार करत आहे.

निफ्टी बँकमध्ये घसरण

निफ्टीवर एचडीएफसी बँक, टायटन, एम अँड एम हे शेअर्स घसरले आहेत. तर डिव्हिस लॅब, ओएनजीसी, सिप्ला, एलटी, हिंदाल्को हे शेअर्स १ ते २ टक्क्यांनी वाढले आहेत. निफ्टी बँक, निफ्टी फायनान्सियल सर्व्हिसेस प्रत्येकी १ टक्क्याने घसरले.

HDFC बँकेचा शेअर्स घसरला, कारण काय?

बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, भारतातील तिसरा सर्वात मूल्यवान असलेल्या HDFC बँक शेअर्सची शुक्रवारी ४ घसरण झाली. बँकेच्या कर्ज आणि ॲडव्हान्स आणि ठेवींच्या वाढीवरील कर्जदाराच्या जून तिमाहीच्या व्यवसाय अपडेटनंतर या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. यामुळे एचडीएफसी बँकेचे ५३ हजार कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT