Robert Kiyosaki  Pudhari
अर्थभान

Robert Kiyosaki: 'शेअर बाजार कोसळणार, करोडोंचं नुकसान होणार', रॉबर्ट कियोसाकी यांची दिला गंभीर इशारा

Robert Kiyosaki Alert: ‘रिच डॅड पुअर डॅड’ चे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांनी जगभरातील शेअर बाजारात मोठ्या घसरणीचा इशारा दिला आहे. त्यांच्या मते, लाखो गुंतवणूकदारांचा पैसा बुडू शकतो आणि आर्थिक मंदीचा फटका सर्व देशांना बसू शकतो.

Rahul Shelke

Stock Market Crash: ‘रिच डॅड पुअर डॅड’ या जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आणि गुंतवणूक सल्लागार रॉबर्ट कियोसाकी यांनी पुन्हा एकदा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना इशारा दिला आहे. त्यांनी सांगितलं की, जगातील शेअर बाजार लवकरच क्रॅश होणार आहेत आणि यावेळी लाखो गुंतवणूकदारांचे पैसे बुडू शकतात. कियोसाकी यांनी या पूर्वीही सोनं-चांदी आणि आर्थिक मंदीबाबत भाकित केलं होतं.

कियोसाकी यांनी ‘X’ (म्हणजेच ट्विटर) वर लिहिलं की “The crash has begun. Millions will be wiped out. Protect yourself.” त्यांच्या मते, अमेरिकन स्टॉक मार्केटमधून लाखो डॉलर्स साफ होणार आहेत, आणि वॉल स्ट्रीटवरील असंख्य गुंतवणूकदारांना मोठे नुकसान होणार आहे. त्यांनी सांगितलं की, अमेरिका आता आर्थिक मंदीच्या दारात उभा आहे, आणि ही घसरण केवळ अमेरिकेपुरती मर्यादित राहणार नाही तर याचा परिणाम जगभरातील बाजारांवर होणार आहे.

भारतीय शेअर बाजारावर काय परिणाम होणार?

कियोसाकींचा इशारा अमेरिकेसाठी असला, तरी त्याचे पडसाद भारतावरही उमटू शकतात.
कारण अमेरिका आणि इतर विकसित देशांमध्ये मंदी किंवा बाजारात घसरण आली, की Foreign Institutional Investors (FII) भारतासारख्या उदयोन्मुख बाजारांमधून भांडवल बाहेर काढतात. याचा थेट परिणाम भारतीय शेअर बाजारावर होतो, आणि काही तासांतच सेन्सेक्स-निफ्टी कोसळतात. गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान एका दिवसात होऊ शकते.

Robert Kiyosaki

गुंतवणूकदारांनी काय करावं?

कियोसाकींचं स्पष्ट मत आहे की, “Stocks, bonds, and fiat currencies are fake money.” त्यांच्या मते, रुपया, डॉलर किंवा अशा कागदी चलनांचा उपयोग नाही. त्याऐवजी त्यांनी क्रिप्टोकरन्सी, सोनं आणि चांदीसारख्या ‘रिअल अॅसेट्स’मध्ये गुंतवणूक करावी. त्यांच्या म्हणण्यानुसार, हेच एसेट्स महागाईवर नियंत्रण ठेवतील आणि संपत्ती टिकवून ठेवतील.

कियोसाकींच्या मते, येणारे काही महिने शेअर बाजारासाठी निर्णायक ठरू शकतात.
त्यांनी सांगितलं की, “आता जे सावध आहेत त्यांना फायदा होणार आहे'' त्यामुळे गुंतवणूकदारांना सल्ला आहे की “थोडा पैसा सोनं-चांदी आणि क्रिप्टोमध्ये वळवा.''

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT