Bank Loan Interest Rate Reduce: भारतीय रिझर्व बँकेने गेल्या आठवड्यात एक मोठा निर्णय घेतला होता. त्यांनी रेपो पेटमध्ये २५ बेसिस पॉईंट्सची कपात केली होती. याचा फायदा कर्ज घेणाऱ्या अनेकांना होणार आहोत. आता या निर्णयाचा प्रभाव देखील पाहावयास मिळत आहे. आरबीआयच्या या मोठ्या घेषणेनंतर ५ मोठ्या बँकांनी आपल्या कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात केली आहे. याचा अर्थ आता विशिष्ट कर्ज स्वस्त होणार आहेत. यात बँक ऑफ बडोदापासून बँक ऑफ महाराष्ट्रापर्यंतच्या मोठ्या बँकांचा समावेश आहे.
आरबीआयने नुकतेच रेपो रेटमध्ये कपात करत तो ५.२५ टक्क्यांवर आणून ठेवला आहे. महागाई आरबीआयच्या ठरलेल्या लिमिटच्या आत आल्यानं आरबीआय असा निर्णय घेण्याची शक्यता होती. त्यामुळं २०२५ मध्ये रेपो रेटमध्ये आतापर्यंत चारवेळा कपात करण्यात आली आहे. एकूण १.२५ बेसिस पॉईंट्सची ही कपात करण्यात आली आहे.
आरबीआयने रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर याचा फायदा आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचवण्यासाठी बँकांनी देखील आपल्या कर्जाच्या व्याजदरात कपार केली आहे.
बँक ऑफ इंडियानं रेपो रेट कमी होताच त्वरित याच्याशी निगडीत कर्ज व्याज दर म्हणजे RBLR मध्ये २५ बेसिस पाँईट्सची कपात केली. त्यामुळं आता हा व्याजदर ८.३५ टक्क्यांवरन ८.१० टक्क्यांवर आला आहे. हे नवे व्याजदर ५ डिसेंबर पासून लागू होणार आहेत.
इंडियन बँकने देखील आपल्या रेपो लिंक्ड बेंचमार्क लेंडिग रेट हा ८.२० टक्क्यांवरून कमी करून ७.९५ टक्क्यांवर आणला आहे. त्याचबरोबर इंडियन बँकने आपल्या ग्राहकांसाठी MCLR म्हणजेच मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ट लेंडिग रेट देखील ५ बेसिस पॉईंट्सनी कमी केला आहे. या बँकांचे नवे व्याजदर हे ६ डिसेंबर पासून लागू होणार आहेत.
Karur Vysya Bank ने देखील आपल्या MCLR दरात कपाक केली आहे. हा निर्णय सर्व प्रकारच्या मुदत कर्जांला लागू असणार आहे. विशेष म्हणजे ही खासगी बँक असून त्यांनी MCLR १० बेसिस पाँईंट्सनी कमी केले आहेत. त्यांनी हे दर ९.५५ वरून कमी करून ९.४५ पर्यंत आणले आहेत. नवे दर हे ७ डिसेंबर पासून लागू होणार आहेत.
बँक ऑफ महाराष्ट्र ने रविवारी RBI रेट कट अनुसार निर्णय घेत रेपो लिंक्ट लेंडिंग रेटशी निगडीत गृहकर्ज, कार लोन, शैक्षणिक कर्जासह अनेक रिटेल कर्जांच्या व्याज दरात २५ बेसिस पाँईंट्सची कपात केली आहे. बँकेच्या म्हणण्यानुसार हे नवे दर ६ डिसेंबर पासून लागू होणार आहेत. यामुळे होम लोन ७.१० टक्के तर कार लोन ७.४५ टक्क्यांपासून सुरू होणार आहे.
बँक ऑफ बडोदाने देखील आरबीआय रेपो रेटमध्ये कपात झाल्यानंतर त्या अनुसरून आपल्या कर्ज व्याज दरात देखील कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. बाँक ऑफ बडोदाने रेपो बेस्ट लेंडिग रेट्समध्ये २५ बेसिस पॉईंट्सची कपात केली आहे. त्यामुळं आता त्यांचा कर्ज व्याजदर हा ८.१५ टक्क्यांवरून ७.९० टक्क्यांवर आला आहे. हे नवे व्याजदर ६ डिसेंबर पासून लागू होणार आहेत.