Raghav Chadha Net Worth: आम आदमी पक्षातील (AAP) महत्त्वाचे नेते राघव चड्ढा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. राज्यसभेतील डेप्युटी लीडर पदावरून त्यांची हकालपट्टी करून अशोक मित्तल यांची नियुक्ती करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. या पार्श्वभूमीवर राघव चड्ढा यांची संपत्ती, शिक्षण आणि करिअरचा आढावा घेऊया.
उपलब्ध माहितीनुसार, राघव चड्ढा यांची एकूण संपत्ती 50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे.
त्यांच्याकडे सुमारे 36–37 लाख रुपयांचे घर असून उर्वरित संपत्ती ही सोने आणि आर्थिक गुंतवणुकीत आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या नावावर कोणतीही मोठी व्यावसायिक गुंतवणूक किंवा उद्योग असल्याची माहिती समोर आलेली नाही.
राघव चड्ढा यांनी चार्टर्ड अकाउंटन्सीचे शिक्षण घेतले असून त्यांनी Deloitte आणि Grant Thornton यांसारख्या प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये काम केले आहे. त्यांचे शालेय शिक्षण दिल्लीतील Modern School येथे झाले, तर त्यांनी University of Delhi अंतर्गत श्री वेंकटेश्वर कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आहे.
राघव चड्ढा यांनी 2019 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती, मात्र त्यात त्यांचा पराभव झाला. त्यानंतर 2020 मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीत विजय मिळवत त्यांनी राजकारणात आपले स्थान मजबूत केले. ते दिल्ली जल बोर्डाचे उपाध्यक्ष म्हणूनही कार्यरत होते. 2022 मध्ये ते वयाच्या अवघ्या 33व्या वर्षी राज्यसभेत पोहोचले आणि सर्वात तरुण खासदारांपैकी एक ठरले.
राघव चड्ढा यांची पत्नी परिणीती चोप्रा ही प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. दोघांचा विवाह राजस्थानातील द लीला पॅलेस उदयपूर येथे मोठ्या थाटामाटात झाला होता, ज्यामध्ये अनेक राजकारणी आणि सेलिब्रिटी उपस्थित होते.
अलीकडील राजकीय घडामोडींमुळे ते पुन्हा चर्चेत आले असून, पुढील काळात त्यांच्या राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.