Petrol-Diesel Price Hike Pudhari
अर्थभान

Petrol-Diesel Price Hike: प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 11 रुपयांची वाढ; सर्वसामान्यांसाठी मोठा धक्का

Petrol-Diesel Price Hike: देशात प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झाली असून XP100 पेट्रोल 11 रुपयांनी महागलं आहे. या दरवाढीमुळे हाय-परफॉर्मन्स वाहनधारकांवर थेट आर्थिक भार वाढणार आहे.

पुढारी वृत्तसेवा

Petrol-Diesel Price Hike: देशात पुन्हा एकदा इंधन दरवाढीने सर्वसामान्यांना झटका दिला आहे. सरकारी तेल कंपनी Indian Oil Corporation (IOCL) ने प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली असून या नव्या दरांची अंमलबजावणी आजपासून करण्यात आली आहे.

XP100 पेट्रोल 11 रुपयांनी महाग

मिळालेल्या माहितीनुसार, 100 ऑक्टेन प्रीमियम पेट्रोल (XP100) ची किंमत दिल्लीत 149 रुपयांवरून थेट 160 रुपये प्रति लिटर झाली आहे. म्हणजेच तब्बल 11 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

तसेच ‘एक्स्ट्रा ग्रीन’ प्रीमियम डिझेलची किंमतही 91.49 रुपयांवरून 92.99 रुपये प्रति लिटरपर्यंत वाढली आहे. हे नवे दर सध्या IOCL च्या पेट्रोल पंपांवर लागू झाले आहेत.

XP100 पेट्रोल म्हणजे काय?

इंडियन ऑइलचे XP100 पेट्रोल (100 ऑक्टेन) हे एक प्रीमियम इंधन असून, ते सामान्य पेट्रोलपेक्षा महाग आहे. हे उच्च-कार्यक्षमतेच्या आलिशान गाड्या आणि स्पोर्ट्स बाईक्ससाठी बनवले जाते.

प्रीमियम इंधन नेमकं कोण वापरतं?

प्रीमियम पेट्रोल आणि डिझेल हे सामान्य इंधनापेक्षा महाग असतं आणि ते प्रामुख्याने हाय-परफॉर्मन्स गाड्यांमध्ये वापरलं जातं. लक्सरी कार, स्पोर्ट्स बाईक्स आणि काही उच्च दर्जाच्या वाहनांमध्ये इंजिनची कार्यक्षमता वाढवण्यासाठी हे इंधन वापरलं जातं. मात्र, आता दरवाढीमुळे अशा वाहनधारकांवर आर्थिक भार वाढणार आहे.

दरवाढीमागची कारणं काय?

इंधनाच्या किमती वाढण्यामागे काही महत्त्वाचे घटक आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत होणारे चढ-उतार, डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण, तसेच रिफायनिंग आणि लॉजिस्टिक्स खर्चात वाढ, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम दरांवर होत आहे.

सर्वसामान्यांवर अप्रत्यक्ष परिणाम

जरी ही वाढ फक्त प्रीमियम इंधनापुरती मर्यादित असली तरी तिचा परिणाम व्यापक असू शकतो. वाहतूक आणि लॉजिस्टिक्स खर्च वाढल्यास त्याचा परिणाम रोजच्या वापरातील वस्तूंवर होतो. त्यामुळे महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर, जे वाहनधारक चांगल्या मायलेजसाठी किंवा इंजिन परफॉर्मन्ससाठी प्रीमियम इंधन वापरतात, त्यांना आता अधिक खर्च करावा लागणार आहे.

इंधन दरवाढ ही केवळ वाहनधारकांपुरती मर्यादित राहत नाही ती संपूर्ण अर्थव्यवस्थेवर परिणाम करते. प्रीमियम पेट्रोल-डिझेल महाग झाल्यामुळे थेट आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारे ग्राहकांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT