PM Modi Gold Purchase Appeal Pudhari
अर्थभान

PM Modi on Gold: एक वर्ष सोनं खरेदी करु नका; पेट्रोल आणि डिझेल... जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर PM मोदींचे आवाहन

PM Modi Gold Purchase Appeal: जागतिक आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे.

पुढारी वृत्तसेवा

PM Modi Gold Purchase Appeal: जगावर घोंघावत असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एक अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे. हैदराबाद येथील जाहीर सभेत बोलताना त्यांनी देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.

'एक वर्ष सोने खरेदी करू नका'

देशातील परकीय चलन साठा सुरक्षित ठेवण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना विनंती केली की, पुढील एक वर्षभर सोन्याची खरेदी टाळावी. भारताला मोठ्या प्रमाणात सोने आयात करावे लागते, ज्यासाठी परकीय चलन खर्च होते. हे चलन वाचवणे सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

इंधन बचतीवर भर (Petrol-Diesel)

पंतप्रधानांनी तेल बचतीचे महत्त्व अधोरेखित करताना म्हटले की, "आपल्याला पेट्रोल आणि डिझेलचा वापर अत्यंत संयमाने करावा लागेल." इंधनाच्या वाढत्या किमती आणि जागतिक पुरवठा साखळीतील अडथळे पाहता, नागरिकांनी इंधनाचा अनावश्यक वापर टाळावा, असे आवाहन त्यांनी केले.

परकीय चलन वाचवण्याचे उद्दिष्ट

जागतिक संकटाच्या काळात भारताची अर्थव्यवस्था भक्कम ठेवण्यासाठी विदेशी मुद्रा (Foreign Exchange) वाचवणे हे सरकारचे प्राधान्य आहे. "आपण जितकी इंधन आणि सोन्याची बचत करू, तितकाच देशाला फायदा होईल," असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT