UPI-Based PF Withdrawal Facility Pudhari
अर्थभान

PF Withdrawal Via UPI-ATM: कामगार मंत्रालयाची गुड न्यूज! आता ATM, UPI द्वारे काढता येणार PF; जून संपण्यापूर्वीच मिळणार सुविधा

Anirudha Sankpal

PF Withdrawal Via UPI-ATM: कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात EPFO बाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. पीएफ खात्यात जमा असलेली रक्कम आता atm आणि upi सुविधेनुसार काढता येणार आहे. याबाबतचा मार्ग मोकळा झाला असून जून महिन्याच्या शेवटी ही सुविधा EPFO सदस्यांना मिळू शकते.

केंद्रीय कामगार मंत्रालयाकडून गुरूवारी ही आनंदाची बातमी देण्यात आली आहे. यात आता EPFO ATM कार्ड किंवा UPI द्वारे पीएफमधील पैसे काढण्याची योजणा या महिन्यापासून लागू होणार आहे असं सांगण्यात आलं आहे.

EPFO वर कामगार मंत्रालय काय म्हणाले?

एटीएम किंवा युपीआयद्वारे पीएफमधील पैसे काढण्याची सुविधा देण्यााबबतचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. जून महिन्याच्या शेवटी ही योजाना लागू होईल. २.०१ सर्व्हर सुरू होताच ही नवी योजना सुरू होणार आहे. त्यानंतर युपीआय किंवा थेट पीएफ अकाऊंटमधून पैसे बँक खात्यात ट्रान्सफर करता येणार आहेत. त्यानंतर हे पैसे एटीएमद्वारे काढता येणार आहेत. श्रम मंत्रालय काही दिवसात ही योजना सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहे.

मंत्र्यांनी दिले होते संकेत

EPFO बाबतची ही मोठी अपडेट केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी याचे संकेत मे महिन्यात दिली होते. त्यांनी जून महिन्यापासून तुम्ही तुमच्या पीएफ अकाऊंटमधील पैसे युपीआय वापरून एटीएमद्वारे देखील काढू शकता.

मंत्र्यांनी EPFO ला पूर्णपणे डिजीटल करण्यात येत आहे. त्यामुळे पीएफ काढणे आता अधिक सोपं होणार आहे. पीएफ खातेदारांना त्यांचे पैसे काढण्यासाठी कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज लागू नये असा सरकारचा उद्येश आहे.

लिमीट किती असणार?

याबाबत अनेक रिपोर्ट गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. त्यानुसार एटीएम किंवा युपीआय विड्रॉलसाठी पीएफ धारकाच्या एकूण पीएफच्या ५० टक्के इतकी ठेवण्यात आली आहे. ही सुविधा मिळवण्यासाठी पीएफ धारकांना आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक अकाऊंट डिटेल्स आणि IFSC कोडशी संबंधित एक अॅक्टिव्ह युनिवर्सल अकाऊंट नंबर गरजेचा असणार आहे.

पीफ खाजे युपीआयशी लिंक करण्यासाठी UAN अॅक्टिव्ह असणे गरजेचे आहे. याचबरोबर आधार बँक अकाऊंट पॅन आणि युएन लिंक असणे बंधनकारक आहे. मोबाईल नंबर देखील आधार आणि बँक खात्याला लिंक असणं गरजेचं आहे. याद्वारेच ओटीपी व्हेरिफिकेशन होणार आहे.

असा अंदाज लावला जात आहे की EPFO पोर्टल किंवा UMANG अॅप लॉग इन केल्यानंतर एक नवीन ऑप्शन दिसणार आहे. त्यात लिंक पीएफ विथ युपीआय किंवा पीफ विड्रॉल व्हाय युपीआय असा पर्याय असणार आहे. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला युपीआय आयडी द्यावा लागणार आहे. त्यानंतर संबंधित युपीआय अॅबवर एक नोटिफिकेशन येईल. त्यात पीएफ अकाऊंड जोडून घेण्यााबबतची परवानगी द्यावी लागेल.

कधी काढता येणार पैसे?

५५ व्या वर्षी निवृत्त झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण पीएफ रक्कम काढता येते. विकलांगता, नोकरी गमावणे, सेल्फ रिटायरमेंट, परदेशात स्थायिक होणे, रिटायरमेंट फंड सेफ्टी सारख्या प्रकरणात तुम्हाला तुमचा पूर्ण पीएफ काढता येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT