Ola Electric IPO
इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ २ ऑगस्ट रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होत आहे.  File photo
अर्थभान

Ola Electric IPO मध्ये पैसे गुंतवण्याची संधी! प्राइस बँड किती? वाचा संपूर्ण डिटेल्स

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

देशातील इलेक्ट्रिक वाहन (EV) निर्माता कंपनी ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ (इनिशिअल पब्लिक ऑफर- Ola Electric IPO) २ ऑगस्ट रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होत आहे. त्यासाठी कंपनीने या आयपीओविषयीची माहिती उघड केली आहे. यासाठी प्रति शेअर ७२-७६ रुपयांचा प्राइस बँड निश्चित केला आहे. अँकर गुंतवणूकदारांची बोली १ ऑगस्टपासून सुरू होईल आणि हा इश्यू ६ ऑगस्टला बंद होईल.

Ola Electric IPO विषयी ठळक मुद्दे

  • २ ऑगस्ट रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला होणार.

  • प्रति शेअर ७२-७६ रुपयांचा प्राइस बँड निश्चित.

  • अँकर गुंतवणूकदारांची बोली १ ऑगस्टपासून सुरू होईल.

  • हा इश्यू ६ ऑगस्टला बंद होईल.

  • गुंतवणूकदार १९५ शेअर्संच्या लॉटमध्ये बोली लावू शकतात.

ओला इलेक्ट्रिकचा आयपीओ सबस्क्रिप्शन २ ते ६ ऑगस्ट दरम्यान खुला राहील. यासाठी गुंतवणूकदार १९५ शेअर्संच्या लॉटमध्ये बोली लावू शकतात. ही रक्कम १४,८२० रुपये गुंतवणुकीच्या अप्पर बँडवर आहे. पात्र कर्मचाऱ्यांना डिस्काउंटमध्ये शेअर दिला जाणार आहे. कर्मचाऱ्यांना प्रत्येक शेअरवर ७ रुपयांचा डिस्काउंट असणार आहे. या इश्यूचा ७५ टक्के हिस्सा क्लालिफाइड इन्स्टिट्यूशनल बायर्स, १५ टक्के नॉन इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदार आणि १० टक्के किरकोळ गुंतवणूकदारांसाठी आरक्षित आहे.

Ola Electric IPO : किती नवे शेअर्स जारी होणार?

Ola Electric IPO ची ६,१४५.५६ कोटी रुपयांचा आहे. या आयपीओच्या माध्यमातून ५,५०० कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी होतील आणि त्यात ८४.९४ दशलक्षपर्यंतच्या ऑफर फॉर सेलचा समावेश आहे. अप्पर प्राइस बँडवर, ऑफर फॉर सेल ६४५.९६ कोटी रुपये आहे. एकूण इश्यू आकार ६१४५.९६ कोटी रुपये असेल. कंपनीचे एकूण बाजार भांडवल सुमारे ३३,५०० कोटी रुपये असणार आहे. प्रमोटर्स भाविश अग्रवाल आणि इंडस ट्रस्ट ऑफर फॉर सेलमध्ये अनुक्रमे ३.७९ कोटी आणि ४१.७९ लाख इक्विटी शेअर्स विकणार आहेत.

ओला इलेक्ट्रिक आयपीओ : गुंतवणूकदारांच्या बोली

ओला इलेक्ट्रिकचे अंदाजे ४ अब्ज डॉलर मूल्याचे उद्दिष्ट आहे, जे त्याच्या शेवटच्या खासगी फंडिंग राऊंडपेक्षा सुमारे २५ टक्क्यांनी कमी आहे. या IPO मधून प्रमुख देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांकडून आकर्षित केले जाण्याची शक्यता आहे.

दिग्गज गुंतवणूकदार बोली लावू शकतात

ओला इलेक्ट्रिकचा IPO फिडेलिटी, नोमुरा आणि नॉर्वेच्या नॉर्जेस बँक तसेच अनेक भारतीय म्युच्युअल फंड गुंतवणूकदार बोली लावण्यासाठी सज्ज आहे, असे रॉयटर्सने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. एसबीआय, एचडीएफसी, यूटीआय आणि निप्पॉन इंडिया यासह किमान चार भारतीय म्युच्युअल फंड या आयपीओसाठी बोली लावतील, असे सुत्रांनी म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT