India Influencer Market 10000 Crore Report: भारतातील इन्फ्लुएंसर सेक्टरचे मार्केट आता 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाले आहे, असा दावा इन्फ्लुएंसर मार्केटिंग SaaS प्लॅटफॉर्म KlugKlug ने केला आहे. हे मार्केट सध्याच्या 3,000–4,000 कोटी रुपयांच्या अंदाजापेक्षा तब्बल तीनपट जास्त आहे.
KlugKlug चे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कुमार यांनी सांगितले की, भारतातील इन्फ्लुएंसर इकोनॉमीचा खरा आकार आतापर्यंत दिसत नव्हता. उद्योगातील खर्च किंवा बिझनेसचा मोठा भाग थेट क्रिएटर आणि ब्रँड यांच्यात होतो, त्यामुळे त्याची नोंद होत नाही.
अहवालानुसार—
भारतातील इन्फ्लुएंसर मार्केटिंगची फक्त 25% गुंतवणूक ही ऑर्गनाइज्ड किंवा मोजता येणारी आहे.
उर्वरित 75% खर्च थेट ब्रँड आणि क्रिएटर यांच्यातील व्यवहारातून होतो, ज्याची कुठेही नोंद होत नाही.
मायक्रो व नॅनो इन्फ्लुएंसर्सच्या सहभागामुळे हा उद्योग अधिक वाढत आहे. हजारो लहान क्रिएटर्स रोज ब्रँड्सकडून मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणत आहेत, परंतु त्याचा आकडा बाजारात दिसत नाही.
अहवालानुसार—
देशात 20 हून अधिक इन्फ्लुएंसर एजन्सीज दरवर्षी 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल कमावतात, तरीही हे फक्त ऑर्गनाइज्ड सेक्टरचे आकडे आहेत.
वेगाने वाढणाऱ्या D2C (Direct-to-Consumer) ब्रँड्सनी खर्चाची पद्धतच बदलून टाकली आहे. 100 पेक्षा जास्त D2C ब्रँड्स स्वतःच्या इन-हाउस टीम्सच्या मदतीने प्रत्येक वर्षी 20 कोटींहून अधिक बजेट इन्फ्लुएंसर कॅम्पेन्ससाठी वापरतात. (एजन्सींवर अवलंबून न राहता)
अनेक ब्रँड्स प्रोडक्ट सीडिंग, बार्टर कोलॅबोरेशन आणि फाउंडर कॅम्पेन्समधून मोठा Earned Media Value (EMV) निर्माण करतात. याची नोंद जाहिरात खर्चात होत नसल्याने इंडस्ट्रीचा खरा आकार कधीच कळत नाही.
Klug Tech चे सह-संस्थापक आणि CPO वैभव गुप्ता यांच्या मते, "भारताच्या इन्फ्लुएंसर मार्केटिंगबद्दलची आकडेवारी नेहमीच अपूर्ण होती, कारण उद्योग फक्त एजन्सींना दिसणाऱ्या माहितीवर अवलंबून राहिला आहे." कल्याण कुमार यांनी सांगितलं की, “AI, ऑटोमेशनमुळे इन्फ्लुएंसर मार्केटिंग बदलत आहे.''