India Post interest certificate Canva
अर्थभान

India Post interest certificate | पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी आनंदाची बातमी! आता घरबसल्या मिळेल इंटरेस्ट सर्टिफिकेट

इंटरनेट बँकिंगद्वारे करा इंटरेस्ट सर्टिफिकेट डाऊनलोड, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

shreya kulkarni

India Post interest certificate

जर तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये सेव्हिंग्स अकाउंट, आरडी किंवा एफडी अकाउंट असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. पोस्टल डिपार्टमेंटने (India Post) ग्राहकांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक सेवा सुरू केली आहे. आता कोणालाही व्याज प्रमाणपत्र (Interest Certificate) मिळवण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या ब्रँचमध्ये जावं लागणार नाही, कारण ही सुविधा घरबसल्या फक्त काही मिनिटांत उपलब्ध झाली आहे.

आता इंटरनेट बँकिंगवरून मिळणार सर्टिफिकेट

पोस्ट ऑफिसच्या इंटरनेट बँकिंग पोर्टलवरून ग्राहक आता थेट ऑनलाईन इंटरेस्ट सर्टिफिकेट डाउनलोड करू शकतात. ही सुविधा सुरू झाल्यामुळे विशेषतः वरिष्ठ नागरिक, नोकरदार वर्ग आणि टॅक्स फाइल करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कशासाठी लागतो इंटरेस्ट सर्टिफिकेट?

  • इंटरेस्ट सर्टिफिकेटचा उपयोग आयकर रिटर्न (ITR) फाईल करताना केला जातो.

  • हे सर्टिफिकेट जमा रकमेनुसार मिळणाऱ्या व्याजाची क्रॉस चेकिंग करायला मदत करतं.

  • ज्या व्यक्तींची वार्षिक आयकराच्या कक्षेत येत नाही, त्यांनी फॉर्म 15G किंवा 15H भरण्यासाठी देखील याचा वापर केला जातो, जेणेकरून TDS कपात टाळता येते.

डाक विभागाचा अधिकृत आदेश

डाक विभागाने 7 मे 2025 रोजी अधिकृत आदेशात जाहीर केलं की, “पोस्ट ऑफिस इंटरनेट बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ई-बँकिंग पोर्टलवरून इंटरेस्ट सर्टिफिकेट डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.”

घरबसल्या इंटरेस्ट सर्टिफिकेट डाउनलोड करण्याची प्रक्रिया

  1. ebanking.indiapost.gov.in या वेबसाइटवर लॉगिन करा.

  2. आधीपासून रजिस्टर असाल, तर यूजर आयडी आणि पासवर्ड टाका. नव्याने रजिस्टर करायचं असल्यास साईन अप करा.

  3. लॉगिन केल्यानंतर "Accounts" टॅबवर क्लिक करा.

  4. त्यानंतर "Interest Certificate" पर्याय निवडा.

  5. हवे असलेलं आर्थिक वर्ष (Financial Year) निवडा.

  6. आता सर्टिफिकेट डाउनलोड करा.

ही सोपी आणि उपयुक्त सुविधा आता लाखो पोस्ट ऑफिस ग्राहकांच्या सेवेत दाखल झाली आहे. तुम्हीही जर पोस्ट ऑफिसमध्ये पैसे ठेवले असतील, तर आजच हे सर्टिफिकेट ऑनलाईन मिळवा आणि गरज पडल्यावर वापरासाठी तयार ठेवा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT